गोरगरिबांचा कैवारी

गोरगरिबांचा कैवारी

गोरगरिबांचा कैवारी

इंदापूर तालुक्याचा विकास निधीची गंगा आणणारे आणि त्यातून तालुक्यातील गावोगावी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यापासून सर्वसामान्य माणसाशी आपली विकासाची नळ जोडण्यापर्यंत यशस्वी ठरलेले माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रेय भरणे मामा यांच्याप्रती सामान्य नागरिकांच्या मनामध्ये निष्ठा पाहायला मिळत असून, गोरगरिबांचा कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

- दत्तात्रेय ठोंबरे, सभापती, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था मर्या. इंदापूर

सत्ता येते-जाते, राजकारणात कोणीही ताम्रपट घेऊन येत नाही. ज्या सामान्य नागरिकांनी आपल्याला अत्यंत विश्वासाने खुर्चीवर बसवले आहे, त्या खुर्चीवर बसून जनहिताची कामे करायची असतात, अशी भावना ठेऊन राज्यामध्ये आपल्या इंदापूर तालुक्याच्या विकासाचा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दत्तात्रेय (मामा) भरणे होय...
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी दत्तात्रेय भरणे यांना मिळाली. त्यातून तालुक्यातील गावागावांतील घराघरापर्यंत रखडलेला विकास करण्याची हिंमत त्यांनी दाखवली. तालुक्यात गरीब सामान्य कुटुंबांची कामे करून आपल्या आमदारकीचा पाया भक्कम केला होता. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्षपद, अशी विविध पदे केवळ कामाच्या जोरावर त्यांना मिळवता आली. तर, सलग दोनदा इंदापूर तालुक्याची विधानसभा जिंकून महविकास आघाडी सरकारमध्ये तब्बल सात महत्त्वाच्या खात्याची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचे कसब, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेब व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मेहनतीने जनमानसात राहुन सांभाळले होते.
कोणत्याही नेत्याकडे एखादे पद कधीही येऊ शकते. मात्र, त्या पदाचा वापर सामान्य जनतेसाठी करण्याची किमया त्याच्या मनात, हातात असावी लागते. खरे तर गरीब जनतेचं भलं करायचं, या ईर्षेने समाजकारणात पाऊल ठेवलेले नामदार दत्तात्रेय भरणे, यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मिळालेल्या सर्व पदांचा उपयोग सामान्य जनतेच्या कामासाठी करून त्या पदाचे अक्षरशः सोने करून दाखवले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रेम दत्तात्रेय भरणे यांच्या पाठीशी सातत्याने राहिले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेक चांगले निर्णय आजपर्यंत त्यांनी जिल्हा परिषद, तसेच आमदारकी आणि छत्रपती साखर कारखान्याच्या माध्यमातून घेतले आहेत. इंदापूर तालुक्याच्या विकासात भरणे यांचा मोठा वाटा आहे. कित्येक वर्षापासून उपेक्षित राहिलेला रखडलेला विकास जनतेच्या घराच्या दारापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करताना ते दिसत आहेत.
अशा या विकासरत्न मामांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

(शब्दांकन : संतोष आटोळे, इंदापूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com