कळाशी येथे बाबर, लवटे यांचा सत्कार

कळाशी येथे बाबर, लवटे यांचा सत्कार

इंदापूर, ता. २ ः इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच रूपालीताई राजेंद्र गोलांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच लतिका नवनाथ करे, मनीषा धनंजय चव्हाण, वैशाली संतोष देवमाने, सुप्रिया बबन करे, अपेक्षा पंजाबराव शिंदे, अंकुश शिंदे, विजय रेडके, संतोष गोलांडे, विकास देवकर, ग्रामसेविका अस्मिता गायकवाड यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विमल रावसाहेब बाबर व रुक्मिणी पांडुरंग लवटे यांना सरपंच रूपालीताई राजेंद्र गोलांडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कळाशी यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मोफत शिलाई मशिन प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून बदली झालेल्या खुसपे, भगत आणि कोळेकर यांचा निरोप समारंभ करण्यात आला.
या प्रसंगी पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक राजेंद्र गोलांडे, माजी सरपंच तुकाराम गोलांडे, नवनाथ करे, सोसायटीचे अध्यक्ष अमोल देवकर, उपाध्यक्ष दादा भालेकर, हनुमंत बाबर, गणेश भांडवलकर, अविनाश सूर्यवंशी, पृथ्वीराज चव्हाण, भीमराव करे, संतोष देवमाने, सहदेव करे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com