इंदापुरात वाहनातील गॅसच्या टाकीला आग

इंदापुरात वाहनातील गॅसच्या टाकीला आग

इंदापूर, ता. १ : इंदापूर शहरातील व्यंकटेशनगर येथील जुन्या शासकीय रुग्णालयाच्या इमारतीलगत असलेल्या एका भंगार विक्रेत्याच्या गोदामात असलेल्या वाहनातील गॅसच्या टाकीने गुरुवार (ता. १) दुपारी उन्हाच्या तीव्रतेने अचानक पेट घेतला. त्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. स्थानिकांच्या तत्परतेने ही आग वेळीच रोखण्यात यश आल्याने भंगार साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या लोकवस्तीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुजर यांच्या भंगारच्या गोदामात बुधवारी (ता. ३१) एका वाहनाच्या गॅसची टाकी भंगार स्वरूपात विक्रीमध्ये आली होती. गुरुवारी दुपारी उन्हाची तीव्रता वाढल्याने या गॅसच्या टाकीतून फसफस असा आवाज सुरु झाला आणि क्षणातच त्या टाकीने अचानक पेट घेतला. यावेळी तेथे उपस्थित असलेले भंगार दुकानाचे कामकाज पाहणारे मालकाचे पाहुणे दिलीप शहा यांनी आग आटोक्यात आण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना गंभीर इजा झाली.
घटना समजताच या भागातील स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणली. तसेच, काही वेळातच या घटनास्थळी इंदापूर नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा दाखल झाली आणि त्यांनी परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. त्यामुळे भंगार गोदामातील इतर साहित्य पेटण्याची मोठी दुर्घटना टळली.

टाकी आली कुठून?
सध्या वाहनांमध्ये सर्रास अनधिकृत एलपीजी, सीएनजी गॅसची जोडणी करून वापर केला जात आहे. यामुळे अनेक वेळा वाहनांनी पेट घेण्याच्या घटना घडत असतात. आता वाहनातून काढून टाकण्यात आलेली टाकीही अपघात घडू शकते, हे सिद्ध झाले. त्यामुळे यापुढे अशा घटना टाळण्यासाठी गॅसची टाकी आली. कुठून वाहनात बसवली कोठे, काढली कोठे, याचीही चौकशी होण्याची मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com