इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिन
इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिन

इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिन

sakal_logo
By

इंदापूर ता. ४ : इंदापूर पोलिस ठाण्यात प्रलंबित असणाऱ्या तक्रार निवारणाबाबत शनिवारी (ता.३) अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या उपस्थितीत ‘तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले. या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी इंदापूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ७३ गावांमधील नागरिकांच्या इंदापूर पोलिस ठाणे येथे प्रलंबित असणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यात आले.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, प्रकाश पवार, महेश माने, पोलिस उपनिरीक्षक सतीश ढवळे, तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी, तक्रारदार आदी उपस्थित होते.
यावेळी २१ अर्जांबाबत संबंधितांच्या तक्रारींचे निरसन करण्यात आले.