सुप्रिया सुळे यांचा 
उद्या इंदापूर दौरा

सुप्रिया सुळे यांचा उद्या इंदापूर दौरा

इंदापूर, ता. ३ : एकीकडे भाजपच्या वतीने इंदापूर तालुक्यातून मिशन बारामती लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार नियोजन सुरू असताना खासदार सुप्रिया सुळे या गेल्या दोन महिन्यात चौथ्या वेळी सोमवार (ता. ५) इंदापूर तालुक्यातील गावांच्या भेटी दौऱ्यावर येत आहेत. विशेष बाब म्हणजे याच दिवशी केंद्रीय जलराज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल हेसुद्धा इंदापूर तालुक्यामध्येच असणार आहेत.
सुळे यांचा सोमवारी तालुक्याच्या पूर्व भागात गावभेट दौरा आहे. यामध्ये त्या विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन गावातील अडीअडचणी व विकासकामांसंदर्भात नागरिकांनी थेट संवाद साधणार आहेत. या प्रसंगी माजी मंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित राहणार आहेत.
या दौऱ्यामध्ये नरसिंहपूर, टणू, पिंपरी बुद्रुक, गोंदी, ओझरे, लुमेवाडी, सराटी, भगतवाडी, पिठेवाडी, चाकाटी, बोराटवाडी, खोरोची या गावांना भेटी देणार आहेत, असे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com