इंदापूरच्या शेतकऱ्याने 
बारामतीत घेतले पेटवून

इंदापूरच्या शेतकऱ्याने बारामतीत घेतले पेटवून

बारामती/इंदापूर, ता. ५ : इंदापूर तालुक्यातील रेडा येथील एका शेतकऱ्याने गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या रस्त्याच्या वादावरून बारामती येथील प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. या घटनेत संबंधित शेतकरी ४० टक्के भाजल्याची माहिती असून, रोहिदास जनार्दन माने, असे या संबंधित शेतकऱ्याचे नाव आहे. त्यास पुढील उपचारासाठी महिला ग्रामीण रुग्णालय बारामती येथे हलविण्यात आले.
रेडा येथील रहिवासी असलेल्या माने यांचा रस्त्यावरून वाद सुरू आहे. दोन कुटुंबातील रस्त्यावरुनचा हा वाद असून, तो सुटण्यासाठी प्रशासनही प्रयत्न करत होते. याबाबत ४ मे रोजी उपोषणही त्यांनी केले होते, ते ७ मे रोजी माघारी घेण्यात आले होते. या प्रकरणात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी स्वतः उपस्थित राहत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, तहसीलदार व बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्यासमवेत अनेकदा बैठकाही झालेल्या होत्या.
मात्र, सोमवारी (ता. ५) दुपारच्या सुमारास बारामती प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारात रोहिदास माने यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले. मात्र, लोकांनी तातडीने त्यांच्या अंगावरची आग क्षमविल्याने त्यांना अधिकचे भाजलेले नाही, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. क्षणार्धात हा प्रकार घडल्याने या परिसरात काही काळ खळबळ माजली होती. दरम्यान, प्रांताधिकारी नावडकर व सुनील महाडीक यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित शेतकऱ्यावर उपचार होण्यासाठी कार्यवाही केली.

सदर रस्त्याबाबतचा वाद हा गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू असून, तहसीलदारांच्या न्यायालयाचा माने यांच्या बाजूने निकाल लागला. मात्र, प्रतिवादीने बारामती प्रांतांकडे अपील केले. प्रांताधिकाऱ्यांनी ते फेटाळले, त्यानुरूप रस्ता खुला करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही केली आहे.
- श्रीकांत पाटील, तहसीलदार, बारामती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com