‘सोमेश्‍वर’कडून शेतकऱ्यांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सोमेश्‍वर’कडून शेतकऱ्यांना दिलासा
‘सोमेश्‍वर’कडून शेतकऱ्यांना दिलासा

‘सोमेश्‍वर’कडून शेतकऱ्यांना दिलासा

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ४ : सोमेश्वर साखर कारखान्याने १२ लाख ६१ हजार टन गाळप केले असून, अजूनही कारखान्यापुढे ४५ हजार टन उसाच्या गाळपाचे आव्हान आहे. सर्व उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही. १३ मेपर्यंत सर्व उसाचे गाळप पूर्ण होईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याचा हंगाम सुरू होऊन सहा महिने उलटले आहेत. मात्र, अजूनही शिल्लक उसाचा प्रश्न आहे. कारखान्याने आजवरच्या इतिहासात सर्वाधिक ११ लाख ३४ हजार टन उसाचे गाळप केले होते. चालू हंगामात प्रचंड प्रमाणात ऊस उपलब्धता असल्याने मागील विक्रम कधीच मोडला. आजअखेर १२ लाख ६१ हजार १९१ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. साखर उतारा ११.७५ टक्के इतका उत्तम मिळवत १४ लाख ७४ हजार ६०० क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. याशिवाय बाहेरच्या कारखान्यांना तीन लाख टनांपेक्षा अधिक ऊस गेला आहे.

बिगरनोंदीच्या उसाचेही गाळप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर संचालक मंडळाने अखेरच्या टप्प्यात बिगरनोंदीचा ऊस गाळप करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सध्या नोंदीचा व बिगरनोंदीचा मिळून अजूनही ४५ हजार टन उसाचे गाळप बाकी आहे. कारखाना सध्या दररोज सहा ते सात हजार टनांचे गाळप करत आहे. आपला ऊस जाईल की नाही, या तणावात असलेल्या शेतकऱ्यांना कारखान्याने १३ मेपर्यंत सर्व गाळप उरकेल, असा दिलासा दिला आहे.

प्रत्येक शेतकऱ्याच्या उसाचे टिपरेही शिल्लक ठेवणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गाळपाबाबत निश्‍चिंत राहावे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर ऊस तोडणी कामगार शेतकऱ्यांकडे पैसे मागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. १ एप्रिलपासून ऊसतोड मजुरांना पन्नास रुपये प्रतिटन, असे तोडणीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. १ मेपासून तोडणीसाठी १०० रुपये प्रतिटन अनुदान दिले जाणार आहे. ऊसतोडणी मजुरांना ही मदत कारखान्याकडून केली जात असल्याने शेतकऱ्यांनी तोडणीसाठी पैसे देऊ नये. तशी मागणी केल्यास कारखान्याकडे लेखी तक्रार करावी. संबंधित मजुरांकडून वसुली केली जाईल.
- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष,
सोमेश्‍वर साखर कारखाना

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01118 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top