‘सोमेश्‍वर’चे गाळप आणखी आठवडाभर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सोमेश्‍वर’चे गाळप आणखी आठवडाभर
‘सोमेश्‍वर’चे गाळप आणखी आठवडाभर

‘सोमेश्‍वर’चे गाळप आणखी आठवडाभर

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १० : जिल्ह्यातील अन्य कारखान्यांचा साखर हंगाम संपला आहे. मात्र, हंगामाचे दोनशे दिवस पूर्ण झाले तरीही सोमेश्वर कारखान्याचे धुराडे अजून धडधडतच आहे. कारखान्याने बिगरनोंदीचाही सर्व ऊस गाळप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गाळपास आणखी आठवडा लागू शकतो.
सोमेश्वर कारखान्याने मंगळवारअखेर (ता. १०) १२ लाख ९० हजार टन इतके इतिहासातली विक्रमी गाळप करताना ११.७५ टक्के इतका उत्तम साखर उतारा प्राप्त केला. त्यामुळे साखरनिर्मिती १५ लाख १० हजार क्विंटल इतकी झाली. गाळपक्षमता प्रतिदिन ६४८५ इतकी गाठली आहे. कारखान्याकडे चालू हंगामात सतरा लाख टन ऊस उपलब्ध होता. तांत्रिक कारणास्तव कारखान्याच्या विस्तारीकरणास उशीर होत होता. त्यामुळे बिगरनोंदीचा चार-पाच लाख टन ऊस गाळप न करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. परंतु, मार्च महिन्याअखेर बिगरनोंदीचा ऊसही गाळप करण्याचा निर्णय घेतला. आजवर अन्य कारखान्यांनी साडेतीन लाख टन ऊस गाळपास नेला आहे. तर, सोमेश्वर कारखान्याकडे सध्या सुमारे पंधरा-वीस हजार टन ऊस शिल्लक आहे. तो फक्त तीन दिवसांचाच असला, तरी तुरळक व अडचणींच्या ठिकाणीच उरला असल्याने त्याच्या गाळपास साधारणतः आठवडा लागू शकतो.

चालू हंगामात आडसाली ऊसच चार महिने गाळप करावा लागला. त्यामुळे पूर्वहंगामी, सुरू, खोडवा तोडणीस विलंब होत गेला. तसेच, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बिगरनोंदीचा ऊस गाळप करण्याचाही निर्णय आम्ही मार्चमध्ये घेतला. त्यामुळे हंगाम संपण्यास उशीर होत आहे. पण, सर्व ऊस संपविला जाईल. शेतकऱ्यांनी काळजी करू नये.
- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्‍वर साखर कारखाना

पुरंदरला उसाच्या क्षेत्रात दुप्पट वाढ
सोमेश्वर कारखान्याच्या बारामती व पुरंदर तालुक्यातील जिराईत भागात ऊस वाढला आहे. एकट्या पुरंदरमध्ये चार वर्षात ऊसक्षेत्र दुप्पट झाले आहे. पुरंदरमधून सन २०१७-१८ मध्ये २ लाख २२ हजार, २०१८-१९ मध्ये ३ लाख १५ हजार, २०१९-२० मध्ये २ लाख ७७ हजार टन गाळप झाले होते. ते २०२०-२१ मध्ये ४ लाख ८ हजार टन झाले तर चालू हंगामात तब्बल ४ लाख ७७ हजार टन गाळप झाले आहे. बागाईत भागातही आठ-दहा टक्के वाढ झाली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01125 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top