‘सोमेश्‍वर’च्या कामगारांना वेतनवाढीचा फरक मिळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सोमेश्‍वर’च्या कामगारांना
वेतनवाढीचा फरक मिळावा
‘सोमेश्‍वर’च्या कामगारांना वेतनवाढीचा फरक मिळावा

‘सोमेश्‍वर’च्या कामगारांना वेतनवाढीचा फरक मिळावा

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १२ : सोमेश्वर कारखान्याने चालू गळीत हंगामात विक्रमी ऊस गाळप व विक्रमी उपपदार्थनिर्मिती केली आहे. त्यामुळे अधिकारी व कामगारांना चाळीस दिवसांचा पगार बक्षीस स्वरूपात मिळावा. तसेच, राज्य सरकारच्या त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार वेतनवाढीचा फरकही मिळावा, अशी मागणी बारामती तालुका साखर कामगार सभेने कारखाना व्यवस्थापनाकडे केली आहे.
राज्य सरकारने साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी स्थापन केलेल्या त्रिपक्षीय समितीने बारा टक्के वेतनवाढ दिली आहे. ती १ एप्रिल २०१९ पासून राज्यातील सर्व कारखान्यांना लागू केली होती. दरम्यान, निर्णयास विलंब झाल्याने कारखान्यांनी सन २०२१ च्या दिवाळीनंतर बारा टक्के वेतनवाढ लागू केली. दरम्यान, १ एप्रिल २०१९ ते ३० ऑक्टोबर २०२१ या कालावधीतील तीस महिन्यांचा वेतनवाढीचा फरक कारखान्यांना द्यावा लागणार आहे. हंगाम संपत आल्याने सोमेश्वर कारखान्याच्या साखर कामगारांनी या फरकाची मागणी संचालक मंडळाकडे निवेदनाद्वारे केली.
राज्यातील प्रसाद शुगर (राहुरी), शिऊर कारखाना (कळमनुरी), शरयू कारखाना (फलटण), बबनराव शिंदे शुगर (पिंपरी) या कारखान्यांनी साखर कामगार व अधिकाऱ्यांना एक महिन्याचे वेतन बक्षीस स्वरूपात जाहीर केले आहे. सोमेश्वर कारखान्यावरही चालू हंगामात १३ लाख टन विक्रमी गाळप केले असून, ११.७५ टक्के साखर उतारा मिळवत सव्वापंधरा लाख क्विंटल साखरनिर्मिती केली. वीज व अल्कोहोल निर्मितीचाही विक्रम झाला. शिवाय अध्यक्ष, कार्यकारी संचालक व संचालक मंडळाच्या कुशल मार्गदर्शनामुळे कारखान्याची अडीच हजार टनांची विस्तारवाढ विना अडथळा सुरू झाली. त्यामुळे कारखान्याच्या अधिकारी व कामगारांना चाळीस दिवसांचे वेतन बक्षीस स्वरूपात द्यावे, अशी मागणी माजी कामगार संचालक बाळासाहेब काकडे व बाळासाहेब गायकवाड यांनी केली.
---

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01127 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top