हरिबुवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरिबुवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध
हरिबुवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध

हरिबुवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १३ : लाटे (ता. बारामती) येथील श्री हरिबुवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सलग दुसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले. सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक नारायण खलाटे यांची तर उपाध्यक्षपदी हरिभाऊ कुंडलिक साबळे यांची निवडही बिनविरोध करण्यात आली.
हरिबुवा सोसायटीसाठी मागील पंचवार्षिक निवडणुकीपासून सुरू झालेली बिनविरोधची परंपरा यावेळीही कायम राहिली. सोसायटीच्या संचालकपदी सचिन जवाहर खलाटे, अनिल पांडुरंग खलाटे, अशोक नारायण खलाटे, शिवाजी आबुराव ताकवले, राजेंद्र दशरथ खलाटे, हरिभाऊ कुंडलिक साबळे, सादिक महंमद पठाण यांची सर्वसाधारण गटातून तर शिवाजी नारायण ननवरे, संदीप पांडुरंग वाघमारे, नामदेव तुकाराम कोळेकर, देवता दिलीपराव खलाटे, संगीता अशोक सुरळकर यांची विविध आरक्षीत गटांमधून बिनविरोध निवड करण्यात आली होती. यानंतर नुकत्याच सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब खलाटे, सचिन खलाटे, सरपंच उमेश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी निवडीही बिनविरोध झाल्या.
निवडणूक प्रक्रियेत जयवंत खलाटे व रवींद्र खलाटे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी नामदेव खलाटे, विश्वास खलाटे, दिलीप खलाटे, संदीप निंबाळकर, बजरंग कोळेकर, बाळासाहेब बोबडे, दीपक खलाटे, अमरदीप खलाटे, मनोज खलाटे उपस्थित होते.

01748

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01128 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top