वाणेवाडीचे तरुण पर्यावरणाचे रक्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाणेवाडीचे तरुण पर्यावरणाचे रक्षक
वाणेवाडीचे तरुण पर्यावरणाचे रक्षक

वाणेवाडीचे तरुण पर्यावरणाचे रक्षक

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ४ : वाणेवाडी (ता. बारामती) येथील ''साद संवाद स्वच्छता'' ग्रुपच्या सातत्यपूर्ण कृतीने गावाच्या पर्यावरणाचे रक्षक बनले आहेत. या ग्रुपने ''एक रविवार गावासाठी व पर्यावरणासाठी'' ही मोहीम राबविली आहे. गेली चक्क सहा वर्ष या ग्रुपमधील पर्यावरणप्रेमी तरुण एकत्र येतात आणि वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता असे उपक्रम राबवतात.

पर्यावरणाच्या प्रश्नाबद्दल गळे काढणारे अनेक मात्र प्रत्यक्ष कृती करणारे फारच थोडे आहेत. मात्र, या मोहिमेमुळे निसर्गासोबत सामाजिक पर्यावरणही सुधारत आहे.
वाणेवाडीतील सजग तरुणांनी ६ मार्च २०१६ रोजी ''साद संवाद स्वच्छता'' ग्रुपची स्थापना केली. ग्रुपमध्ये तरुण, युवा व शालेय वयाचे ९२ सदस्य आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील कडक कालावधी वगळता प्रत्येक रविवारी ते सकाळी सात वाजता एकत्र येतात. पर्यावरणाची मोहीम राबवितात.

याशिवाय हे तरून शाळा, बाजारतळ, स्मशानभूमी, दवाखाना, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करतात. शौचालय नसलेल्या कुटुंबाना भेटून प्रबोधनाव्दारे गाव हगणदारीमुक्त केले आहे. दरम्यान, या ग्रुपला लोकसहभागातून सहा वर्षात जवळपास तीन लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

गावातील ग्रामपंचायत, पतसंस्था, सोसायट्या यांच्यासह वैयक्तीक मदत मिळते म्हणूनच अथकपणे काम सुरू आहे. ९२ पैकी साठजण सक्रिय सदस्य असून दर रविवारी त्यापैकी किमान वीसेकजण वेळ काढून स्वच्छता, वृक्षारोपणासाठी येतात. ट्री गार्डला हजारभर घालविण्यापेक्षा सातशे-आठशे रुपयांचे बारा फुटी झाड लावतो. झाडांसोबत गावाचे आरोग्यही सुधारत आहे.
- ज्ञानेश्वर जगताप, समन्वयक, साद संवाद स्वच्छता ग्रुप

सामाजिक उपक्रमातही अग्रेसर
साद संवाद ग्रुपतर्फे सेना दिन, महिला दिन, डॉक्टर दिन साजरा करतात. किल्लेस्पर्धा, व्याख्याने, पाणी फाउंडेशनच्या कामात श्रमदान केले आहे. सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांना व केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत पाठविली. वंचित मुले व ऊसतोड मजुरांच्या मुलांना कपड्यांचे वाटपही करतात.
कोरोनाकाळात कोरोना सेंटरला मदत, कोरोना कीट वाटप, कोरोना योध्द्यांचा सन्मान केला.

वृक्षारोपणाला जागाच नाही शिल्लक
साद संवाद स्वच्छता ग्रुपच्या सार्वजनिक ठिकाणे, रस्ते याकडेला खड्डे घेतात, खते आणतात आणि झाडे लावतात. कधी झाडांभोवतीचे तण काढतात, पाणी व खते घालतात. आतापर्यंत बाजारतळ, स्मशानभूमी, गावांतर्गत रस्ते, शाळा, कालवा अशा ठिकाणी वड, पिंपळ, बहावा अशी सहाशेपेक्षा देशी झाडे मोठी केली आहेत. आता झाडे लावायलाच सार्वजनिक जागा उरली नाही.

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01147 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top