''गळीत हंगामाची दुसरी रक्कम ३० जूनपूर्वी खात्यात वर्ग करा'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''गळीत हंगामाची दुसरी रक्कम ३० जूनपूर्वी खात्यात वर्ग करा''
''गळीत हंगामाची दुसरी रक्कम ३० जूनपूर्वी खात्यात वर्ग करा''

''गळीत हंगामाची दुसरी रक्कम ३० जूनपूर्वी खात्यात वर्ग करा''

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ४ : चालू गळीत हंगामाचे दुसरे बिल प्रतिटन २०० रुपये व खोडकी बिल प्रतिटन १५० रुपये असे एकूण ३५० रुपये प्रतिटनप्रमाणे रक्कम सभासदांच्या खात्यावर ३० जूनपूर्वी वर्ग करावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी केली आहे.
पावसापूर्वी शेतकऱ्यांच्या मशागतीची कामे व ऊस लागवडीची तयारी सुरू आहे. शैक्षणिक हंगामही आल्याने सभासदांना पैशांची गरज आहे. चालू हंगामात कारखान्याने १३ लाख २५ हजार टन उच्चांकी गाळप करून १५ लाख ५४ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सोमेश्वरने जिल्ह्यात सर्वाधिक ११.७३ टक्के साखर उतारा मिळविला आहे. याशिवाय सहवीजनिर्मिती व अल्कोहोल निर्मितीदेखील चांगली झाली आहे. त्यामुळे सभासदांना साडेतीनशे रुपयांचा हप्ता अदा करण्यास हरकत नाही.
चालू हंगामात अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांचे नियोजन चुकल्याने गाळपास विलंब झाला. १९-२० महिने ऊस शेतात उभा राहिला. ज्यांनी गाळपाला न्यावा म्हणून ऊस पेटवून दिला त्यांच्या ऊस बिलातून प्रतिटन ८०० रुपये कपात करण्याचा खासगी कारखान्यासारखा मनमानीपणे निर्णय घेण्यात आला. ऊसतोड मजुरांनाही शेतकऱ्यांना पाच ते पंचवीस हजार रुपये तोडीसाठी द्यावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. संचालक मंडळाची मीटिंग बोलावून प्रतिटन आठशे रुपयांची कपात परत करण्याचा ठराव करावा, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.
यापुढील काळात अध्यक्षांनी फक्त कारखाना चांगला कसा चालेल आणि सभासदांना जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल हे पहावे. अन्य गावात लक्ष घालण्यासाठी अजितदादांनी कारखान्याचे पद दिले नाही, अशी टीका काकडे यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01148 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top