''नाफेड''ने कांद्याची खरेदी करावी : शेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''नाफेड''ने कांद्याची खरेदी करावी : शेट्टी
''नाफेड''ने कांद्याची खरेदी करावी : शेट्टी

''नाफेड''ने कांद्याची खरेदी करावी : शेट्टी

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १० :''''केंद्रसरकार कांद्याच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पहात नसल्याने कांद्याच्या निर्यातीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे ऐन तेजीच्या दिवसातही कांद्याचे बाजारभाव गोत्यात गेले आहेत. लोणंद बाजार समितीत एक महिन्यात कांद्याचे आधीच निचांकी असलेले भाव आणखी दीडशे ते दोनशे रुपये प्रतिक्विंटलने घटले आहेत. त्यामुळे नाफेडने कांद्याची खरेदी सुरू करावी आणि निर्यातीत पुढाकार घ्यावा,'''' अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
मागील वर्षात शेतकऱ्यांचा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील कांद्याचे पीक मातीमोल झाले. फेब्रुवारी महिन्यात कांद्याचा भाव २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलवर पोचला होता. त्यानंतर कांदा गडगडत राहिला तो आजतागायत. आता तर उत्तम प्रतिचा कांदा १००० ते १२२५ रुपये प्रतिक्विंटल, मध्यम प्रतिचा कांदा ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल व लहान कांदा ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन पोचला आहे. एक महिन्यापूर्वी उत्तम कांद्याचा दर ११०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल होता. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात बाजारात कांदा विक्री परवडत नसल्याने चाळींमध्ये कांदा जपून ठेवला होता. परंतु आता पावसाळी वातावरणात तो खराबही होत आहे. उरलेला कांदा बाजारात येत आहे आणि त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. केंद्रसरकारने संपूर्ण वर्षभर दरवाढीसाठी कसलाही हस्तक्षेप केला नाही.

बांगलादेश आर्थिक अडचणीत असल्याने भारतीय कांद्याच्या आयातीकडून स्वतःच लागवडीकडे वळला आहे. श्रीलंकेबाबतही अडचण आहे. परंतु मलेशिया, सिंगापूर, आखाती देशात काही प्रमाणात कांदा जात आहे. कांद्याचे भावाबाबत कुठलेही भविष्य वर्तवता येणार नाही.
-बिपिन शहा, कांदा निर्यातदार

''केंद्र सरकारने झोपेतून जागे व्हावे''
बांगलादेश साठ टक्के कांदा खरेदी करत होता. परंतु केंद्रसरकारच्या आयात-निर्यात धोरणातील लहरीपणामुळे बांगलादेशाने भारतीय कांदा थांबवून इराककडून कांदा खरेदी केला. श्रीलंकेतही अंतर्गत यादवीमुळे निर्यात होत नाही. यावर दुष्काळात तेरावा महिना म्हणजे केंद्रसरकारने नाफेडव्दारे होणारी कांदा खरेदी बंद केली आणि आपलाच कांदा स्थानिक बाजारात आणला. आता तरी केंद्रसरकारने झोपेतून जागे व्हावे आणि कांदाखरेदी करून बांगलादेशकडून होणाऱ्या कापड आयातीवर निर्बंध लावावेत, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.
--
कांद्याचे दर रूपये प्रतिक्विंटलमध्ये
दिनांक मोठा मध्यम गोल्टी
८ ऑगस्ट १००० ते १२२५ ७०० ते १००० ३०० ते ७००
१ ऑगस्ट १००० ते १२७५ ६०० ते ११०० ३०० ते ६००
२७ जुलै १००० ते १३०० ८५० ते १००० ४०० ते ८५०
७ जुलै ११०० ते १४०० ६०० ते ११०० ३५० ते ६००

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01226 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..