''फ्लूट सागा’तर्फे साउंड ऑफ युनिटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''फ्लूट सागा’तर्फे साउंड ऑफ युनिटी
''फ्लूट सागा’तर्फे साउंड ऑफ युनिटी

''फ्लूट सागा’तर्फे साउंड ऑफ युनिटी

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १४ ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ''फ्लूट सागा अकादमी''च्या बासरीवादन पथकाने आठ मिनिटांचे देशभक्तिपर संगीताचे ''साउंड ऑफ युनिटी'' नावाने फ्यूजन बनविले आहे. राष्ट्रीय दर्जाचे बासरीवादक भरतराज यांच्यासह गुळुंचे (ता. पुरंदर) येथील अमर निगडे या बासरी वादकानेही त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग नोंदविला आहे. पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य भरतराज यांच्यासह पुणे, मुंबईतील बासरीवादकांनी एकत्र येत यमन रागावर आधारित बासरीच्या सुमधुर सुरावटींमध्ये देशभक्तिपर संगीत तयार केले आहे. गाथा अकादमीचे अमर निगडे, प्रतिमा कुमारी, वंशिका पुरी, नंदकुमार, डॉ. गोपालकृष्ण, शुभम राणे, आरती कुमारी, भावसार, प्रशांत ढमाले अशा भरतराज यांच्या शिष्य व सहकाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01232 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..