पुरंदरमधील दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
पुरंदरमधील दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

पुरंदरमधील दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

पुणे : पुरंदर तालुक्यातील पिंगोरी व कर्नलवाडी या गावांतील दोघांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पिंपरे गावचे जगन्नाथ मानसिंग भोसले यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी राहुल दिनकर शिंदे (रा. पिंगोरी, ता. पुरंदर) व भरत अर्जुनराव निगडे (रा. कर्नलवाडी, ता. पुरंदर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, दोघेही नीरा गावचे दैनिकांचे वार्ताहर आहेत.

काही दिवसांपूर्वी नीरेतील शिवाजी चौकातून हजरतबाबा पठाण महाराज यांची मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीतील भोसले यांचा आरोपींनी जातिवाचक उल्लेख करत अपमान केला होता. त्यावरून भोसले यांनी जेजुरी ठाण्यात फिर्याद दिली होती. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील हे अधिक तपास करत आहेत.