केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचा गैरवापर दुर्दैवी : मुंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dhananjay munde
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचा गैरवापर दुर्दैवी : मुंडे

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचा गैरवापर दुर्दैवी : मुंडे

सोमेश्वरनगर : ऊसतोड मजुरांच्या कल्याणासाठी गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फत आमच्या सरकारने खूप चांगले निर्णय घेतले. त्यांच्या मुलांसाठी बावीस तालुक्यात वसतीगृह उभारण्याचे नियोजन असून त्यापैकी वीस ठिकाणी भूसंपादनाचा निर्णयही झाला होता. मजुरांसाठी पारंपरिक कोयत्याऐवजी ''बॅटरी कोयता'' देऊन ऊसतोडणीतून उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट होते. सरकार बदलले तरी याचा पाठपुरावा करण्यात कमी पडणार नाही, असा विश्वास माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, स्वतःची खुर्ची व पक्ष टिकविण्यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचा गैरवापर दुर्दैवी असल्याचे मतही त्यांनी मांडले. करंजेपूल (ता. बारामती) येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन यादव यांच्या निवासस्थानी मुंडे यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी ''सकाळ''शी संवाद साधला. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, रमाकांत गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, कालिदास निकम, दत्ता माळशिकारे, सरपंच वैभव गायकवाड, कैलास मगर उपस्थित होते. यानिमित्ताने ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचे कार्य करणारा टाटा ट्रस्टसचा आशा प्रकल्प आणि सोमेश्वर कारखान्याचा कोपीवरची शाळा प्रकल्प याबाबत मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.

आतापर्यंत ३ लाख ८६ ऊसतोड मजुरांची नोंदणी महामंडळाने केली आहे. कारखान्यांनी प्रतिटन दहा रूपये आणि राज्य सरकारकडून दहा रुपये अशा निधीची अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. त्यामुळे साडेतीनशे कोटी महामंडळास मिळतील. ऊसतोड मजुरांना चार्जिंग बॅटरीवरील कोयता देऊन त्यांचे अघोरी श्रम कमी करायचे नियोजन होते. मजूर जोडपे रोज तीन टनांऐवजी साडेपाच टन ऊस तोडू शकतील. ऊस लवकर तुटून लवकर कारखान्यावर जाऊन त्यांचाही साखर उतारा वाढेल. कारखान्याने चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून द्यावेत
- धनंजय मुंडे, माजी सामाजिक न्यायमंत्री

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01243 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..