‘आपले शिक्षक’ उपक्रमावर बहिष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आपले शिक्षक’ उपक्रमावर बहिष्कार
‘आपले शिक्षक’ उपक्रमावर बहिष्कार

‘आपले शिक्षक’ उपक्रमावर बहिष्कार

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. २९ : राज्याचा शिक्षण विभाग सातत्याने परिपत्रके काढून शिक्षकांना कामाला लावण्याची भूमिका पार पाडत आहे. आता ‘आपले गुरुजी हे अजब फर्मान काढले आहे. या आदेशानुसार शिक्षकांनी स्वतःचे ए-४ आकाराचे रंगीत छायाचित्र दर्शनी भागात लावायचे आहे! याबाबत शिक्षक वर्गातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने या उपक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

राज्यात क्वचित ठिकाणी मूळ शिक्षकाऐवजी तोतया शिक्षक आढळून येण्याच्या घटना घडतात. त्यामुळे मुलांना आपले गुरुजी कळावेत म्हणून शिक्षण विभागाने हे अजब फर्मान काढले आहे आणि शिक्षकांसोबत मुलांच्या आकलन क्षमतेवरही अविश्वास प्रकट केला आहे. सदर परिपत्रकानुसार जिल्हा परिषदांनीही गटशिक्षण अधिकाऱ्यांना तातडीने आदेश बजावले आहेत. या आदेशानुसार शिक्षक/शिक्षिका यांनी ए-४ आकाराचा रंगीत फोटो काढून सन्मानपूर्वक वर्गाच्या दर्शनी भागात ‘आपले गुरुजी मथळ्याखाली प्रदर्शित करावयाचा आहे. फोटोवर फक्त नाव टाकायचे आहे. दोन आठवड्यात मोहिमेची पूर्तता करावयाची आहे. पुणे जिल्हा परिषदेने तर रोज किती जणांनी प्रदर्शित केले आणि नाही केले, याची माहिती गोळा करण्यास सुरवात केली आहे. या मोहिमेबाबत शिक्षक व पालकही संतप्त झाले आहेत.

केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी हे रोज गुरूजींच्या संपर्कात असतात. आम्हा ग्रामस्थांनाही गुरुजींचा सातबारासुद्धा माहीत असतो. तोतयावर फौजदारी गुन्हे दाखल करा, पण त्यासाठी लाखो शिक्षकांवर गैरविश्वास दाखवणे गैर आहे. त्यापेक्षा गुणवत्तेचे बोलावे.
- अॅड. नवनाथ भोसले, पालक

शिक्षक संघाचा बहिष्कार
याबाबत पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देत ‘आपले गुरुजी या मोहिमेवर जाहीर बहिष्कार घालत असल्याचे निवेदन दिले. ‘आधीच उपक्रमांमुळे शिक्षकांचा शालेय कामकाजाचा वेळ वाया जात असून शिकवू द्या, अशी आर्जव करत आहोत. अशात ‘आपले गुरुजी आदेशाने शिक्षकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. शिक्षणाचे प्रश्न दीर्घकाळ रखडलेले असताना शिक्षकांना प्रेरणा देण्याऐवजी त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. फोटो लावून कुठलीही गुणवत्तावाढ नाही, उलट हे अपमानजनक आहे. त्यामुळे आदेश तातडीने रद्द व्हावा, अशी मागणी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01254 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..