सोमेश्वरनगरला रोडरोमिओंवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमेश्वरनगरला रोडरोमिओंवर कारवाई
सोमेश्वरनगरला रोडरोमिओंवर कारवाई

सोमेश्वरनगरला रोडरोमिओंवर कारवाई

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ३ : येथील शैक्षणिक संकुलात शिकायला येणाऱ्या मुलींभोवती चकरा मारणाऱ्या रोडरोमिओंना आज वडगाव निंबाळकर पोलिसांनी आपला हिसका दाखविला. त्यामुळे दुचाकींवरून चमकोगिरी करणाऱ्या रोमिओंची पळता भुई थोडी झाली. परिसरातून या कारवाईचे स्वागत होत आहे.
येथील परिसरात करंजेपूल, वाघळवाडी व वाणेवाडी गावात असलेल्या शाळा महाविद्यालयात जवळपास पाच हजार मुले-मुली शिक्षण घेत आहेत. काही मुली एसटीने तसेच सायकल अथवा दुचाकीवरून येतात. मात्र, परिसरातील काही अति उत्साही युवक व तरुण महाविद्यालयाबाहेर व बस स्थानकावर गाड्या लावून टेहळणी आणि शेरेबाजी करतात तर अनेकजण रस्त्याने बेफाम गाड्या उडवत मुलींच्या मागेपुढे करतात. हे रोमिओ अलीकडे शिक्षकांना व परिसरातील नागरिकांनाही जुमानेसे झाले आहेत. यामुळे अनेक सामान्य व गरीब कुटुंबातील मुली भीतीच्या व दहशतीच्या वातावरणात ये- जा करत होत्या. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी सबुरीची भूमिका घेतली होती पण अखेर आज पोलिसांना दंडुका उगारावा लागला.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, उपनिरीक्षक योगेश शेलार व त्यांच्या पथकाने रोमिओगिरी करणारांना चांगलाच प्रसाद दिला. तर ट्रिपल सीट व भरधाव दुचाकी पळविणाऱ्या युवकांवर दंडात्मक कारवाई केली. पोलिसांचा हा अवतार बघून एका तरुणीनेही करंजेपूल पोलिस चौकी गाठून टॉर्चर करणाऱ्या रोमिओची माहिती दिली. त्याला पोलिसांनी थर्ड डिग्री दाखवून दिली.
याबाबत योगेश शेलार म्हणाले, ‘‘आता दररोज शाळा-महाविद्यालय परिसरात साध्या वेशात पोलिस फिरणार आहेत. युवकांचे भविष्य लक्षात घेऊन सौम्य कारवाई केली आहे. पुन्हा तोच युवक सापडला तर मात्र कठोर कारवाई करणार आहोत. मुलींनी भयमुक्त वातावरणात शिक्षण घ्यावे. काहीही तक्रार असल्यास करंजेपूल पोलिस दुरक्षेत्रात न घाबरता तक्रार द्यावी. मुलींचे नाव गोपनीय राहील.’’

01979

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01259 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..