‘माळेगावा’त समाविष्ट होणे फायद्याचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘माळेगावा’त समाविष्ट होणे फायद्याचे
‘माळेगावा’त समाविष्ट होणे फायद्याचे

‘माळेगावा’त समाविष्ट होणे फायद्याचे

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. २३ : ‘‘सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करणे, ही व्यावहारिकदृष्ट्या फायद्याची बाब आहे. वाहतुकीच्या दृष्टीने जवळचा, चांगला भाव देणारा आणि शैक्षणिक संकुलही दर्जेदार असणाऱ्या माळेगाव कारखान्याचा स्वीकार करण्यास सभासदांनी पाठिंबा द्यावा,’’ असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब परकाळे यांनी केले.
बारामती तालुक्यातील अंजनगाव, जळगाव क. प., जळगाव सुपे, देऊळगाव, कारखेल, भिलारवाडी, नारोळी, कोरोळी, काऱ्हाटी, खराडेवाडी ही दहा गावे सोमेश्वर कारखान्याच्या जिराईत क्षेत्रात स्थापनेपासून आहेत. माळेगाव कारखान्याने पत्राद्वारे ‘सोमेश्वर’कडे ही गावे मागितली आहेत. दोन्ही कारखान्यांनी आपापल्या वार्षिक सभेतही सभासदांपुढे हा विषय ठेवला आहे. ‘माळेगाव’ने दहा गावांतील सभासदांनी मागणी नोंदविली असल्याचे; तर ‘सोमेश्वर’ने एकाही सभासदाने मागणी नोंदविली नसल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर या जिराईत भागाचे पंधरा वर्ष सोमेश्वरवर प्रतिनिधित्व करणारे परकाळे यांनी ‘सकाळ’कडे भूमिका मांडली. अशी जाहीर भूमिका घेणारे ते पहिलेच नेते आहेत.
परकाळे म्हणाले, ‘‘सोमेश्वर कारखान्याशी तीन पिढ्यांचे भावनिक संबंध तोडणे दुःखद वाटते आहे. परंतु, व्यावहारिकदृष्ट्या माळेगाव फायद्याचा ठरणार आहे. आम्हाला ‘सोमेश्वर’च्या तुलनेत वाहतुकीसाठी माळेगाव खूपच जवळ आहे. ऊसदेखील तुटल्यावर कारखान्यावर लवकर पोचून नुकसान टळणार व वाहतूक कमी येणार आहे. ‘माळेगाव’चा भावदेखील ‘सोमेश्वर’पेक्षा अधिक किंवा त्याच तोडीचा असतो. ‘सोमेश्वर’चे शैक्षणिक संकुल प्रगती करत आहेच, पण ‘माळेगाव’चे शैक्षणिक संकुलही फायद्याचे ठरणार आहे. ‘सोमेश्वर’च्या वार्षिक सभेतही ‘माळेगाव’कडे जाण्याचीच भूमिका मांडणार आहे.

ऊसतोडीचा प्रश्न अजितदादांकडे मांडणार
सोमेश्वर कारखाना अडचणीच्या काळात बागायत भागाच्या तुलनेत जिराईत भागाला एक महिना लवकर ऊसतोड देतो. याबाबत ‘माळेगाव’चे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व अजितदादा पवार यांच्याकडे आग्रही भूमिका मांडणार आहे. दोन्ही कारखाने अजितदादांच्या नेतृत्वाखालील असल्याने ‘माळेगाव’कडे काहीही अडचण आली तर अजितदादा सोडवू शकतात, असे मतही बाळासाहेब परकाळे यांनी मांडले.

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01288 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..