दर तीन वर्षांनी बेण्यामध्ये बदल करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दर तीन वर्षांनी बेण्यामध्ये बदल करा
दर तीन वर्षांनी बेण्यामध्ये बदल करा

दर तीन वर्षांनी बेण्यामध्ये बदल करा

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ४ : ''''उसाचे बेणे बदलल्याने पंधरा ते वीस टक्के उत्पादनात वाढ होते. त्यामुळे दर तीन वर्षांनी उसाच्या बेण्यामध्ये बदल केला पाहिजे. कारखान्याचा विचार करता दरवर्षी एकूण लागवडीमध्ये तीस टक्के बेणे बदललेले असले पाहिजे. नऊ-दहा महिन्यांचे रसरशीत बेणे घेऊन ते एक डोळा पध्दतीने किंवा रोपे तयार करून वापरा. त्याने उगवण क्षमता ९५ टक्क्यांवर जाईल,'''' असे मत ऊस विशेषज्ज्ञ डॉ. भरत रासकर यांनी दिली.

नीरानजीक पाडेगाव (ता. फलटण) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या वतीने उसाच्या बेणे वाटपाचा प्रारंभ आज सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी उसाच्या फडातच शेतकऱ्यांशी डॉ. रासकर यांनी संवाद साधला.
दरम्यान, ऊस पैदासगार डॉ. रामदास गारकर यांनी फुले ११०८२ हा लवकर पक्व होणाऱ्या नव्या वाणाची माहिती दिली.

याप्रसंगी सोमेश्वरचे संचालक शैलेश रासकर, नाना फरांदे, डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. दीपक डामसे, मृदाशास्त्रज्ञ डॉ. सूरज नलावडे, ऊस रोग शास्त्रज्ञ डॉ. सूरज नलावडे, ऊस बेणे विक्री अधिकारी डॉ. दत्तात्रेय थोरवे आदी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील राहुल भोकरे या शेतकऱ्यास उसाच्या बेण्याची पहिली मोळी प्रदान करण्यात आली.


रासकर यांच्या टीम मॅनेजमेंटचे कौतुक
पाडेगाव ऊस संशोधन केंद्र परंपरेने दहा ते पंधरा एकर ऊस बेणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत होते. मात्र ते परिसरालाही पुरत नव्हते. डॉ. भरत रासकर व त्यांच्या टीमने हे क्षेत्र दोनच वर्षात ६२ एकरावर नेले आहे. यामुळे राज्यभरातूनच नव्हे तर मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ राज्यातही पाडेगावचे बेणे जाऊ लागले आहे. या प्रगतीबाबत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व शेतकऱ्यांनी रासकर यांच्या टीम मॅनेजमेंटचे यांचे कौतुक केले.
---
02044