''छत्रपती'' मागे पडतो याचे वाईट वाटते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''छत्रपती'' मागे पडतो याचे वाईट वाटते
''छत्रपती'' मागे पडतो याचे वाईट वाटते

''छत्रपती'' मागे पडतो याचे वाईट वाटते

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ९ : ''''सोमेश्वर कारखान्याचे सभासद नशीबवान आहेत. त्यांना भावही चांगला मिळतो आणि सभासदत्व घ्यायला कुणाची चिठ्ठी लागत नाही. प्रशांत काटे आपण वाईट वाटून घेऊ नका पण आपला छत्रपती मागे पडतो याचे वाईट वाटते,'''' अशा व्यथा माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केली.

इंदापूर, नीरा भीमा कारखान्यात शेतकऱ्यांना सभासदच करून घेत नाहीत आणि मग निवडणूक बिनविरोध करायची. सहकारी कारखाना पण खासगीसारखा चालवतात, अशी परखड टीका हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.
सोमेश्वर साखर कारखान्यावर पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात भरणे यांनी सोमेश्वर कारखान्याचे तोंड भरून कौतुक केले. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी अंतिम भाव ३०२० देत असल्याचे जाहीर केले. तसेच विविध विकासकामांची उद्‌घाटने पार पडली. याने भरणे भारावले होते. या कार्यक्रमात छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे उपस्थित होते.
भरणे म्हणाले, तीन हजार भाव मिळूनही फार टाळ्या वाजवत नाही. सोलापूर, इंदापूरशी किंवा आमच्या कारखान्याशी तुलना करा. तुम्ही पाठीवर थाप दिली तर कारभाऱ्यांना ऊर्जा मिळेल. तुम्हाला अजितदादा पवार यांचे नेतृत्व मिळाले, अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळाने चांगले काम केले. प्रशांतदादा, तुम्हाला वाईट वाटेल पण मी अध्यक्ष असताना सोमेश्वर, माळेगावशी दराची चढाओढ असायची.

''सोमश्वर''चे दुसरे युनिट
पुरंदर तालुक्यात पुरंदर उपसा योजना व आगामी काळात येणारी गुंजवणी योजना यामुळे उसाचे क्षेत्र वाढणार आहे. सोमेश्वरने दहा गावांना माळेगावकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुरंदरमधील प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सभासद करून घ्या. तसेच दरवर्षी ऊस अतिरिक्त होत असल्याने पुरंदरला मध्यवर्ती ठिकाणी दुसरे युनिट सुरू करावे, अशी मागणी आमदार संजय जगताप यांनी केली.
---
02054