मुरूममध्ये आजी-माजी संचालकांची प्रतिष्ठेची लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरूममध्ये आजी-माजी संचालकांची प्रतिष्ठेची लढत
मुरूममध्ये आजी-माजी संचालकांची प्रतिष्ठेची लढत

मुरूममध्ये आजी-माजी संचालकांची प्रतिष्ठेची लढत

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १५ : मुरूम (ता. बारामती) ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक रंगतदार अवस्थेत पोचली आहे. ओबीसी आरक्षणाअंतर्गत असलेल्या सरपंचपदासाठी नंदकुमार नामदेव शिंगटे विरुद्ध गणपत मारुती फरांदे, अशी लक्षवेधी लढत होत असून, यामध्ये सोमेश्वर कारखान्याच्या आजी-माजी संचालकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तालुक्यात-जिल्ह्यात राजकीय प्रतिनिधित्व करणाऱ्या मुरूम या गावात दोन गटात सरळ लढत होत आहे. सत्ताधारी प्रस्थापित गटाच्या मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी विकास पॅनेलला नव्या-जुन्या पिढीच्या गटाने मल्लिकार्जुन गावकरी परिवर्तन पॅनेलने आव्हान दिले आहे. निवडणुकीत उच्चशिक्षित तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उतरली आहे. सर्व तेरा जागांवर स्वाभिमानी व परिवर्तन यांच्या समोरासमोर सामना होत आहे. निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांसह गावकी-भावकी, ओबीसी, अतिक्रमणे असे विविध मुद्दे उकरून काढले जात असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षीत असलेल्या सरपंचपदासाठी उद्योजक नंदकुमार शिंगटे व प्रगतशील शेतकरी गणपत फरांदे यांच्यात सामना होत आहे. प्रभाग एकमध्ये स्वाभीमानीच्या विक्रम अशोक शिंदे, अश्विनी संदीप चव्हाण, शिवानी शेखर सोनवणे यांना परिवर्तनच्या अक्षय संजय जगताप, सविता दिलीप धुमाळ आणि सुरेखा बुध्देश्वर काकडे यांनी आव्हान दिले आहे. प्रभाग दोनमध्ये स्वाभिमानाच्या प्रज्ञा राहुल शिंदे व स्वप्नील रावसाहेब कदम या उच्चशिक्षितांना डॉ. अमोल सुरेश जगताप आणि पूजा विशाल फरांदे उच्चशिक्षितांनी कडवे आव्हान दिले आहे. प्रभाग तीनमध्ये स्वाभिमानीचे सोमनाथ प्रताप सोनवणे व वर्षा सोमनाथ जगताप यांचा परिवर्तनचे बाळू गणपत सोनवणे व अरुणा माणिक जगताप यांचा सामना होत आहे. प्रभाग चारमध्ये भावकीतली लढत रंगत आहे. स्वाभिमानाच्या कांतिलाल हनुमंत भंडलकर, नीता विनायक भंडलकर व अजित हनुमंत भोसले यांचा सामना अंकुश मल्हारी भंडलकर, प्रकाश संपतराव भंडलकर, रंजना कृष्णा भंडलकर यांच्याशी होत आहे. तर, प्रभाग पाचमध्ये बंटीराजे वसंतराव जगताप व प्रशिल प्रकाश जगताप या चुलत्या-पुतण्याची लढत लक्षवेधी ठरली आहे. याशिवाय मंगल शशिकांत सोनवणे व सदफ रशिदभाई इनामदार हे सुलभा अजित सोनवणे व हसीना सुलतान इनामदार यांच्याशी लढत आहेत.
---