इंदिरा गांधी तांत्रिक विद्यालयात महिला दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदिरा गांधी तांत्रिक विद्यालयात महिला दिन
इंदिरा गांधी तांत्रिक विद्यालयात महिला दिन

इंदिरा गांधी तांत्रिक विद्यालयात महिला दिन

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १७ : तंबाखू किंवा काट्याच्या मिसरीचा दात घासण्यासाठी अजिबात वापर करू नये. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण तर मिळतेच. शिवाय आहार, पचन या व्यवस्थेवर परिणाम होतो आणि अॅनिमियाचा धोका संभवतो. याशिवाय चहाचा अतिवापरही शरीरासाठी घातक ठरतो आहे. याउलट चौरस व सकस आहार घ्या. खाण्याच्या आणि विश्रांतीच्या वेळा चुकवू नका असा सल्ला डॉ. तेजश्री जगताप यांनी दिला.

येथील इंदिरा गांधी तांत्रिक विद्यानिकेतन या महिलांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्यावतीने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. जगताप ''मी व माझे आरोग्य'' या विषयावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या सविता काकडे होत्या. यावेळी रागिणी कुलकर्णी, स्मिता काकडे, सुलभा काकडे, भारती काकडे, संजय घाडगे आदी उपस्थित होते. यानिमित्ताने ''समर्थ लॅब''तर्फे ८२ महिलांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी केली. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचाही सत्कार केला. यामध्ये ''सकाळ''च्या गुळुंचे येथील बातमीदार श्रध्दा जोशी यांचा ''जिजाऊ-सावित्री'' पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष गौरव केला.
उज्वला लोखंडे, राणी काकडे, प्रीती फरांदे, संदीप पांडुळे, चंद्रकांत पवार यांनी संयोजन केले. सचिव नितीन कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रियांका तांबे यांनी सूत्रसंचालन केले तर सारिका जगताप यांनी आभार मानले.