सोमेश्‍वर पतसंस्था सचिवास उच्च न्यायालयाकडून जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमेश्‍वर पतसंस्था सचिवास 
उच्च न्यायालयाकडून जामीन
सोमेश्‍वर पतसंस्था सचिवास उच्च न्यायालयाकडून जामीन

सोमेश्‍वर पतसंस्था सचिवास उच्च न्यायालयाकडून जामीन

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. २२ : येथील सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेद्वारे सन २०१०-११ मध्ये बेकायदेशीरपणे कर्जप्रकरणे करून फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला सचिव संपत गंगाराम बनकर यास मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला.
सोमेश्वर पतसंस्थेमध्ये विविध बेकायदेशीर प्रकरणांचा ४७ लाख रुपयांचा गैरव्यवहार उजेडात आला होता. याप्रकरणी अडीच महिन्यांपूर्वी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सचिव बनकर यास फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. बारामती येथील जिल्हा न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्याने उच्च न्यायालयात जामीन दाखल झाला होता. संचालक मंडळ वगळून सचिवावर गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण सहकार क्षेत्राचे या दाव्याकडे लक्ष लागले होते.
तेथे झालेल्या सुनावणीत सदरची बेकायदेशीर कर्जे पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी मंजूर केल्याने झाली असल्याचा व सचिव हा चेअरमन व संचालक मंडळाच्या आदेशानुसार काम करीत असल्याचा युक्तिवाद ॲड. डॉ. उदय वारुंजीकर, ॲड. गणेश आळंदीकर व ॲड. आदित्य खारकर यांनी केला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. बोरकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत बनकर यास जामीन देण्यात आला, अशी माहिती ॲड. आळंदीकर यांनी दिली.