वाणेवाडीत रविवारपासून पवनपुत्र व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाणेवाडीत रविवारपासून
पवनपुत्र व्याख्यानमाला
वाणेवाडीत रविवारपासून पवनपुत्र व्याख्यानमाला

वाणेवाडीत रविवारपासून पवनपुत्र व्याख्यानमाला

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. २३ : वाणेवाडी (ता. बारामती) येथील यात्रा महोत्सवानिमित्त २६ ते २८ मार्च या कालावथीत तीन दिवसीय ‘पवनपुत्र व्याख्यानमाला’ आयोजित केली आहे. व्याख्यानमालेचे हे सतरावे वर्ष आहे. वाणेवाडी येथील गामस्थ मंडळाच्या हनुमान देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी व्याख्यानमाला व त्यानंतर सप्ताह सोहळा आयोजित केला जातो. व्याख्यानमालेत रविवारी (ता. २६) सोशल मिडिया स्टार वसंत हंकारे यांचे ‘चला जगूया आनंदाने’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवारी (ता. २७) ‘दंगल’कार नितीन चंदनशिवे व ग्रामीण कवी सोमनाथ सुतार हे दोघे ‘मी, माझं जगणं आणि कविता’ या विषयावर मांडणी करणार आहेत, तर समारोपास मंगळवारी (ता. २८) अॅड. वैशाली डोळस यांचे ‘स्त्रियांची दिशा आणि दशा’ या विषयावर व्याख्यान होणार आहं. सर्व व्याख्याने हनुमान मंदिसमोरील प्रांगणात सायंकाली साडेसहा वाजता सुरू होणार आहेत.