मतपेटीत तेहतीस उमेदवारांचे भवितव्य बंद

मतपेटीत तेहतीस उमेदवारांचे भवितव्य बंद

सोमेश्वरनगर, ता. २४ : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (ता. २८) नऊ केंद्रावर ३१३८ पैकी २९७१ म्हणजेच ९४.६७ टक्के मतदान झाले. सोळा जागांसाठी उभ्या असलेल्या तेहतीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून उद्या (ता. २९) मतमोजणीनंतर कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. निकालात महाविकास आघाडीची प्रतिष्ठा आणि युतीचे अस्तित्व पणाला लागले आहे.
नीरा बाजार समितीत पुरंदरच्या ९५ सोसायटी व ९० ग्रामपंचायती तर बारामतीच्या ६१ सोसायट्या व २८ ग्रामपंचायती मतदानासाठी समाविष्ट आहेत. सकाळी आठपासून नऊ केंद्रावर मतदानाला अत्यंत शांततेत सुरवात झाली १२ पर्यंत पन्नास टक्के मतदान झाले होते. ग्रामपंचायत मतदारसंघात १०९२ पैकी १०३५ (९४.७८%) मतदारांनी तर सोसायटी मतदारसंघात १९१७ पैकी १८१६ (९४.७३%) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हमाल व तोलारी मतदारसंघात सासवड केंद्रावर ५० तर नीरा केंद्रावर ७० असे एकूण १२० (९३ %) मतदान झाले. मुर्टीने सोसायटीसाठी शंभर तर ग्रामपंचायतीसाठी नव्व्याण्णव टक्के इतके सर्वाधिक मतदान केले. तुलनेने सासवडला कमी मतदान झाले. आमदार संजय जगताप, माजी मंत्री विजय शिवतारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, भाजप नेते जालिंदर कामठे आदींनी विविध केंद्रांना भेटी दिल्या.
बाजार समितीत राष्ट्रवादी, काँग्रेस व ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप-शिवसेना-आरपीआय-शेतकरी संघटना यांनी शड्डू ठोकला होता. मविआने व्यापारी मतदारसंघातील दोन्ही जागा बिनविरोध पटकावच खाते खोलले होते. यानंतर सुरवातीला सुस्त असलेल्या प्रचारात अखेरच्या दोन-तीन दिवसातच रंगत आली. युतीच्या प्रचारतंत्रामुळे आघाडीनेही अखेरीस मरगळ झटकून काम केले. त्यामुळे आता उद्याच्या मतमोजणीतच सतत सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीपुढे युतीने कितपत आव्हान दिले आहे हे स्पष्ट होणार आहे.

मतदान केंद्र ग्रामपंचायत सोसायटी हमाल-तोलारी
सासवड २६४/२४४ ३७७/३५९ ५६/५०
जेजुरी १५३/१४५ २६४/२५३
नीरा १४४/१३७ २७६/२६० ७३/७०
परिंचे १३८/१२४ १७६/१६७
नायगाव १२७/१२४ १७८/१६६
सोमेश्वरनगर ७२/६९ १४८/१३८
वडगाव ९३/९१ २२८/२१५
लोणी भापकर ४७/४६ १४८/१३६
मुर्टी ५६/५५ १२२/१२२


02561

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com