
शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. लक्ष्मण रोडे
सोमेश्वरनगर, ता. ११ : पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी महाविद्यालयाचे (मंचर) प्रा. लक्ष्मण रोडे यांची, तर कार्याध्यक्षपदी काकडे महाविद्यालयाचे (सोमेश्वरनगर) प्रा. राहुल बाळासाहेब गोलांदे यांची निवड झाली.
पुणे येथे संघटनेची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष संतोष फासगे होते. याप्रसंगी २०२३-२६ कालावधीसाठी संघटनेची कार्यकारिणीत बारामती व इंदापूरच्या जागेसाठी मतपत्रिकेव्दारे निवडणूक झाली. तर अन्य सर्व जागा बिनविरोध झाल्या.
पदाधिकारी निवडीत उपाध्यक्षपदी प्रा. चंद्रकांत नांगरे (भोर), प्रा. बी. आर.. घोडके (औंध) व प्रा. तारा पवार (वाघोली) यांची, सचिवपदी प्रा. विक्रम काळे (चिंचवड) यांची, सहचिटणीसपदी प्रा. गोपीचंद करंडे (भोसरी) व दानियाल मांडलिक (शिरूर) यांची तर कोषाध्यक्षपदी प्रा. आदिनाथ दहिफळे (लोणावळा) यांची, समन्वयकपदी राजेंद्र निकत (पुणे) व प्रा. बापू कोळेकर (दौंड) यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून पुणे शहरातून प्रा. हिंमत तोबरे, प्रा. डॉ. संतोष बिरादार, प्रा. सुभाष पालवे, प्रा. राजकुमार मुळे, प्रा. मुकुंद सावळकर यांची निवड झाली.
पिंपरी चिंचवडमधून प्रा. गंगाधर घाटगे, प्रा. लक्ष्मण जगदाळे यांना संधी मिळाली. प्रा. बाळासाहेब गायकवाड (हवेली), प्रा. समीर श्रीमंते (जुन्नर), प्रा. सुंदर लोंढे (पुरंदर) प्रा. शरद सोमवंशी (खेड), प्रा. सोपान शेंडगे (मुळशी) यांना बिनविरोध संधी दिली. बारामतीतून प्रा. राहुल गोलांदे व इंदापूरमधून प्रा. रोहिदास भांगे हे मतदानातून निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. पंडितराव पाटील, प्रा. सुधाकर पडवळ यांनी काम पाहिले.