दुधाची दर घसरण थांबणार

दुधाची दर घसरण थांबणार

सोमेश्वरनगर, ता. २४ : दुधाच्या दरात हळूहळू घसरण होत असल्याने दूध उत्पादक शेतकरी प्रचंड धास्तावला आहे. प्रतिलिटिर ३७ ते ३८ रूपये लिटर असणारे दर आता ३३ रूपयांवर आले आहेत. याबाबत सोनई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी, उपपर्दार्थांचे दर घसरल्याने दूधदर घसरले आहेत. मात्र, आता किमान दिवाळीपर्यंत ३३ रूपये प्रतिलिटरपेक्षा दर कमी होणार नाहीत,’ असा दावा केला आहे.
दुधाचे दर गेली सहा महिने वाढत जाऊन प्रतिलिटर ३७ ते ३८ रूपयांवर जाऊन पोचले होते. मात्र, मेच्या पहिल्याच आठवड्यात एक रूपयांनी घसरले. ही घट आता पाच रूपयांवर पोचली आहे. मागील आठवड्यात ३४ ते ३५ रूपये असणारा दर मंगळवारपासूनच ३३ रूपये प्रतिलिटर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी दर घटेल, अशी भिती पसरली असून, तो अस्वस्थ झाला आहे. गाईंच्या किमतीही अचानक घटल्या आहेत आणि छोटे डेअरी व्यवसायिकही धास्तावले आहेत.
केंद्र सरकारने, दुग्धजन्य पदार्थांची गरज पडली तर आयात करू, असे सूचित केल्यापासून दूध दराला घरघर लागली. आयातीच्या अफवेने देशात व्यापाऱ्यांनी दूधपावडरचे दर पाडले. सव्वातीनशे रूपये किलो असलेली पावडर २८५ रूपयांवर आली आहे. परिणामी दूधधंद्यावर नियंत्रण असलेल्या प्रकल्पांनी दुधाच्या दरात घट करायला सुरवात केली आहे. ‘अमूल’चे दर मात्र अजून टिकून आहेत.
याबाबत दशरथ माने म्हणाले, ‘‘देशात फक्त राज्यानेच ३८ रूपये प्रतिलिटर दर दिला आहे. केंद्र सरकारकडून झालेल्या आयातीच्या चर्चेने बाजारात घबराट पसरली. आयात झाली नसली तरी पावडरचे दर पन्नास रूपयांनी घटले, तर बटरही ४१५ रूपये प्रतिकिलोहून ३८५ वर घसरले. अशात ग्राहकही नसल्याने उपपदार्थ पडून आहेत. त्यामुळे दुधाचे दर घसरले आहेत. अमूल पिशवीबंद दूधविक्रीत असल्याने टिकून असेल. मात्र, आता व्हायची तेवढी घट झाली आहे. यापुढे शेतकऱ्यांनी आजिबात घाबरू नये. ३३ रूपयांपेक्षा एक रूपयाही घट होणार नाही. भविष्यात कुठल्याही काळात तीस रूपयांपेक्षा दर कमी होणार नाहीत.’’

दुधाचा खरेदी दर आता ३३ रूपये प्रतिलिटर झाले आहेत. राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष असून, दराची घट रोखण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप करणे आवश्यक झाले आहे.
- संदीप जगताप, अध्यक्ष, बारामती सहकारी दूध संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com