शिक्षकांकडून आंदोलनाचा इशारा

शिक्षकांकडून आंदोलनाचा इशारा

सोमेश्वरनगर, ता. २७ : राज्य सरकारच्या अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे वितरण होत असताना राज्य सरकारच्याच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना अजूनही दुसरा आणि तिसरा हप्तादेखील दिला नाही. दरवर्षी आदेश निघतात, परंतु शिक्षकांनाच पैसे उपलब्ध होत नाहीत. वारंवार निवेदने देवून आणि भेटी घेऊनसुद्धा प्रश्न सुटत नाही. यामुळे आता राज्यव्यापी धरणे धरणार आणि निदर्शने करणार, असा इशारा प्राथमिक शिक्षक समितीने दिला आहे. याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना नोटीसही दिली आहे, अशी माहिती समितीचे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी सांगितले.
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करण्याबाबत राज्याच्या वित्त विभागाने आदेश दिले आहेत. यामध्ये जून २०२३ महिन्याच्या वेतनासोबत उर्वरित रक्कम मिळणार आहे. प्राथमिक शिक्षकांना मात्र जुलै २०१९ नंतर आजपर्यंत ही थकबाकी मिळाली नाही. याबाबत सात दिवसात कार्यवाही झाली नाही, तर राज्यव्यापी निदर्शने करणार, अशी नोटीस शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे व राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांना दिली आहे.
केवळ शिक्षकांना वगळण्याचे कोणतेही कारण समर्थनीय नाही. विलंबाबाबत कारणे शासनास नोटीस बजावल्यामुळे आता सरकारने आवश्यक अनुदान उपलब्ध करून देण्यासह पुढील कार्यवाहीसाठी यंत्रणांना आदेशित करणे गरजेचे आहे. दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी, असे मत नंदकुमार होळकर यांनी मांडले आहे.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त पहिला हप्ता प्रदान केले असून, तीन हप्ते थकीत असल्याची माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील वाघ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com