पुरुषोत्तमदादा : संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ

पुरुषोत्तमदादा : संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ

Published on

सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक-संचालक कै. रामराजे जगताप यांचे सुपुत्र पुरुषोत्तमदादा हे अपघातानेच राजकारणात आले. अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी कुटुंबाचा, शेताचा आणि राजकीय वारसा जपण्याची जबाबदारी दादांच्या खांद्यावर पडली. पुढे ‘सोमेश्वर’च्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर आली. मात्र, कॅप्टन कूल धोनीप्रमाणे शांत, संयमी, अबोल आणि वेळप्रसंगी संस्थेच्या हितासाठी आक्रमक बनून सर्व जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या.
- महेश काशिनाथ काकडे, मा. संचालक सोमेश्वर कारखाना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना साखर उद्योगात त्यांचे नाव राज्यभर आदराने घेतले जात आहे. सोमेश्वर कारखान्याचे नेतृत्व करत असतानाच त्यांनी रामराजे सहकारी सोसायटी, रामराजे सहकारी पतसंस्था, आधार सहकारी पतसंस्था, सहकारी दूध संस्था यातही यश मिळविले.
पवार यांनी सन २०१३ मध्ये पुरुषोत्तम जगताप नेतृत्वगुण पाहूनच सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. त्यावेळच्या विपरित परिस्थितीत सभासदांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि साथ दिली. त्यामुळे चारच वर्षात कारखाना कर्जमुक्त झाला आणि गेली आठ वर्षे राज्यात सर्वाधिक भाव देणारा कारखाना बनला आहे.
अजितदादांचे मार्गदर्शन सभासदांचा पाठिंबा, संचालक मंडळाची निर्णयक्षमता, कामगार-अधिकाऱ्यांची साथ, वाहतूकदार-तोडणी कामगारांशी सलोखा यामुळे गेल्या आठ वर्षात सोमेश्वरने सरासरी ३२१७ रुपये इतका उच्चांकी बाजारभाव दिला आहे. सन २०१७-१८ मध्ये ३००० रुपये, २०१८-१९ मध्ये ३३०० रुपये, २०१९-२० मध्ये ३००० रुपये, २०२०-२१ मध्ये ३१०० रुपये, २०२१-२२ मध्ये ३०२० रुपये, २०२२-२३ मध्ये ३३५१ रुपये, २०२३-२४ मध्ये ३५७१ व २०२४-२५ मध्ये रुपये प्रतिटन भाव सभासदांना दिला आहे.

चांगले दर देत असतानाच साडेपाच हजार टनी सोमेश्वर कारखाना आता साडेसात हजार टनी झाला आहे. उत्तम तांत्रिक क्षमतेमुळे तो दहा हजार टनांनी चालतो आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्प आता १८ मेगावॅटवरून ३६ मेगावॉट झाला आहे. डिस्टिलरीचीसुद्धा ३० केएलपीडीची क्षमता ९० केएलपीडी होत आहे. तसेच शिक्षणसंस्थाही प्रगती करत आहे. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, एमबीए, विज्ञान महाविद्यालयात पूर्ण क्षमतेने उच्चांकी प्रवेश झाले आहेत. सोमेश्वर विद्यालयाच्या चारही शाखा, पब्लिक स्कूलही चांगली कामगिरी करत आहे. यासोबत ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा हा अभ्यासवर्ग चालविणारा सोमेश्वर राज्यातला एकमेव कारखाना आहे.
सोमेश्वर कारखान्याला २०१३ पासून आतापर्यंत नामांकित व मानांकित संस्थांचे तब्बल बारापेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. उत्कृष्ट तांत्रिक व्यवस्थापन २०१३ व २०१७, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन २०१६, बेस्ट डिस्टिलरी-२०१९, उत्कृष्ट ऊर्जाबचत व संवर्धन पुरस्कार २०१६, शुगर इंडस्ट्री व्हीजन समिती निवड, आदर्श चीफ केमिस्ट, बेस्ट एमडी-२०२३, व्हीएसआयचा आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट फायनान्स मॅनेजर, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता-२०२४, राष्ट्रीय महासंघाचा सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार २०२५, कोजन इंडियाचा सर्वोत्कृष्ट कोजन पुरस्कार २०२४ या उच्चतम पुरस्कारांचा समावेश आहे.
यामुळेच सगळ्या राज्यात ‘सोमेश्वर माझा - अभिमान माझा’ अशी गौरवास्पद भावना सभासदांच्या मनात निर्माण करणाऱ्या पुरुषोत्तमदादा जगताप यां नेतृत्वाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...!
(शब्दांकन : संतोष शेंडकर, सोमेश्वरनगर)
05018, 05019

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com