‘खडकवासला’तून दुसऱ्या आवर्तनाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘खडकवासला’तून दुसऱ्या आवर्तनाची मागणी
‘खडकवासला’तून दुसऱ्या आवर्तनाची मागणी

‘खडकवासला’तून दुसऱ्या आवर्तनाची मागणी

sakal_logo
By

शेटफळगढे, ता. ५ : खडकवासला कालव्याचे पहिले उन्हाळी हंगामातील आवर्तन बंद होऊन जवळपास ३५ दिवसांचा कालावधी झाला आहे. त्यातच सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिका यांचे पाणी कमी पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचित करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
खडकवासला प्रकल्पात यावर्षी शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. मात्र, जलसंपदा विभागाने आजवर दोन आवर्तने शेती सिंचनासाठी दिली आहेत. त्यापैकी रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडलेले एकमेव आवर्तन इंदापूर तालुक्यातून केवळ आठ दिवसांत बंद झाले होते. त्यानंतर १० मार्चला जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी आवर्तन सोडले होते. ते तालुक्यात २१ दिवस चालले. मात्र, हे आवर्तन बंद होऊन जवळपास ३५ दिवसांचा कालावधी झाला आहे. अशातच उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पिके सिंचनाला येत आहेत. परंतु, विहिरी व कूपनलिका यांचे पाणी कमी पडल्याने शेतकऱ्यांना आपली शेती सिंचित करण्यात अडचणी येत आहेत.

विहिरींचे जलस्त्रोतही आटले
याशिवाय कालव्याला पाणी येऊन ३५ दिवस झाल्याने पाणी पुरवठ्याच्या विहिरींचे भूमिगत जलस्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे गावच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. आजवरचा अनुभव लक्षात घेता २० मेनंतर मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते. त्यामुळे उशिरा खडकवासला कालव्याचे आवर्तन सोडून शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होणार नाही. सध्या गरज असल्याने जलसंपदा विभागाने खडकवासला कालव्याला इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी तत्काळ दुसरे आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Spg22b00349 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top