‘लाकडी निंबोडी’चा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लाकडी निंबोडी’चा मार्ग मोकळा
‘लाकडी निंबोडी’चा मार्ग मोकळा

‘लाकडी निंबोडी’चा मार्ग मोकळा

sakal_logo
By

शेटफळगढे, ता. १२ : इंदापूर तालुक्यातील गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली. जलसंपदा विभागाने याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी (ता. १७) काढला. या योजनेद्वारे इंदापूर व बारामती या दोन्ही तालुक्यातील १७ गावांतील ७ हजार २५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
इंदापूर तालुक्यातील जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या योजनेची सन १९९५ पासून आजवरच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत चर्चा झाली. मात्र, प्रत्यक्षात या योजनेस मान्यता मिळाली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या योजनेसाठी पाठपुरावा केला. योजनेस मंजुरी मिळाल्यामुळे योजनेशी संबंधित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या योजनेच्या माध्यमातून सिंचनाखाली येणारे तालुकानिहाय व गावनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये) पुढीलप्रमाणे- इंदापूर तालुका- लामजेवाडी- २३८.१, शेटफळगढे- १३८.८), म्हसोबाचीवाडी- ७५६.६, निरगुडे- ६६५.२, लाकडी- ७४०.७, निंबोडी- ४५५.५, शिंदेवाडी- ५४३.८, काझड- ५१३.७, वायसेवाडी- १६२.६, धायगुडेवाडी अकोले- १२२.७. (एकूण ४ हजार ३३८ हेक्टर). बारामती तालुका- कटफळ- ७४४.८, सावळ- ९०४.९, जैनकवाडी- ४७७.७, पारवडी- २०८.८, कण्हेरी-२५७.८, काटेवाडी- २१६.१, गाडीखेल- १०२.४. (एकूण २ हजार ९१३ हेक्टर)

योजनेचे स्वरूप
- या योजनेसाठी उद्भव उजनी धरणाच्या जलाशयातून कुंभारगाव येथून पाणी उचलण्यात येणार आहे. त्याकरिता ०.९० अब्ज घनफूट (२५.४८४ दलघमी) पाण्याची तरतूद केली आहे.
- या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये ५०.१० मीटर व दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुक्रमे ५१.२० मीटर व ७३.२० मीटर शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलून बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाला दिले जाणार आहे.
- कुंभारगाव येथे योजनेचे पहिले, तर शेटफळगढे येथे योजनेचे दुसरे पंपगृह केले जाणार आहे, कुंभारगाव येथे ७६५ अश्‍वशक्तीचे ४, शेटफळगढे येथे ५७० अश्‍वशक्तीचे २; तर ६४० अश्वशक्तीचे ३ विद्युत पंप बसविण्यात येणार आहेत.
- लामजेवाडी येथे योजनेचे पहिले वितरण कुंड व जैनकवाडी येथे योजनेचे दुसरे वितरण कुंड बांधले जाणार आहे.
- कुंडातून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाला पाणी दिले जाणार आहे.

गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेली ही योजना मार्गी लागल्याने गोरगरीब जिरायती शेतकऱ्यांचे शेती सिंचनाचे स्वप्न यामुळे पूर्ण होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह संपूर्ण राज्य सरकारचे मी शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. लवकरच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या योजनेचे भूमिपूजन केले जाणार आहे.
- दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री

Web Title: Todays Latest District Marathi News Spg22b00353 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top