कृषी विभागाकडून पंचायत समितीस अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी विभागाकडून पंचायत समितीस अनुदान
कृषी विभागाकडून पंचायत समितीस अनुदान

कृषी विभागाकडून पंचायत समितीस अनुदान

sakal_logo
By

कृषी विभागाकडून
पंचायत समितीस निधी

शेटफळगढे ता. २ : जिल्ह्यात १ जुलै कृषी दिन साजरा करण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेला कृषी विभागाच्या वतीने अनुदान देण्यात आले. त्याअंतर्गत हा जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांना प्रत्येकी दहा हजार व पुणे जिल्हा परिषदेला २० हजाराचा निधी प्राप्त झाला. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, कृषी विषयक चित्रफिती दाखवावित, जिल्हा परिषद स्तरावर छोटेसे कृषी प्रदर्शन या निधीतून आयोजित करावे, अशा सूचना जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना या शासन निर्णयाच्या आधारे दिल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली कामगिरी विचारात घेऊन शासनाच्या वतीने प्रतिवर्षी एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

Web Title: Todays Latest District Marathi News Spg22b00371 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top