६ जूनला इंदापुरात ३० ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय सोडतीसाठी विशेष ग्रामसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

६ जूनला इंदापुरात ३० ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय सोडतीसाठी  विशेष ग्रामसभा
६ जूनला इंदापुरात ३० ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय सोडतीसाठी विशेष ग्रामसभा

६ जूनला इंदापुरात ३० ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय सोडतीसाठी विशेष ग्रामसभा

sakal_logo
By

शेटफळगढे : इंदापूर तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत येत्या ६ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात काढल्या जाणार आहेत. त्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यासाठी ३० अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसेच, त्यांच्या मदतीला गाव कामगार तलाठी यांना नियुक्त केले आहे. याबाबतचे आदेश इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील पाटील यांनी दिले. तालुक्यातील प्रभागनिहाय आरक्षणासाठी ज्या ग्रामपंचायतींच्या विशेष ग्रामसभा होणाऱ्या गावांची नावे पुढीलप्रमाणे- पडस्थळ, हिंगणगाव, आजोती, सुगाव, माळवाडी, पिंपरी खुर्द, शिरसोडी, बिजवडी, झगडेवाडी, जंक्शन, आनंदनगर, डाळज नंबर २, डाळज नंबर ३, डाळज नंबर १, न्हावी, थोरातवाडी, कळाशी, करेवाडी, वरकुटे बुद्रुक, रणमोडवाडी, जांब, मानकरवाडी, कुरवली, म्हसोबाचीवाडी, मदनवाडी, लाखेवाडी, बोरी, रेडणी, बेलवाडी, डिकसळ, गंगावळण, सराटी.

Web Title: Todays Latest District Marathi News Spg22b00373 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top