
जिल्ह्यातील १३३ अंगणवाड्यांसाठी १५ कोटी
शेटफळगढे, ता. ६ : जिल्ह्यातील १३३ नवीन अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी प्रत्येकी ११ लाख २५ हजार याप्रमाणे १४ कोटी ९६ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मंजूर झालेल्या या १३३ अंगणवाड्यांच्या इमारती जुन्या नादुरुस्त झाल्या होत्या. तर काही अंगणवाड्यांच्या इमारती या प्राथमिक शाळा, ग्रामपंचायती समाज मंदिरे, जिल्हा परिषदेच्या खोल्या व खासगी जागेत भरत होत्या. त्यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ या वर्षांमध्ये सर्वसाधारण योजनेमधून या अंगणवाडी इमारतींच्या बांधकामासाठी हा निधी मंजूर केला आहे.
यापूर्वी अंगणवाड्यांच्या इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास आठ लाख रुपयांचा निधी दिला जात होता. परंतु, वाढत्या महागाईमुळे या निधीतून मंजूर झालेल्या अनेक अंगणवाडी इमारतींची कामे अपुरी राहिली होती. त्यामुळे महागाई व इतर सर्व बाबींचा विचार करून इमारत बांधकामाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून प्रत्येक अंगणवाडीसाठी ११ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ३१ मार्च २०२३ पर्यंत खर्च करण्याची जबाबदारी बांधकाम विभाग दक्षिण व उत्तर या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे.
निधी मंजूर झालेल्या अंगणवाड्या
तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे
आंबेगाव ४, बारामती १२, भोर ६, दौंड १९, इंदापूर ३३, जुन्नर १०, खेड ६, मावळ ९, मुळशी ९, पुरंदर १९, शिरूर ५, वेल्हे १
जिल्ह्यात १३३ अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी प्रत्येकी ११ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी मंजूर केलेल्या प्लॅननुसारच याचे बांधकाम होणार आहे. याशिवाय प्रत्येक अंगणवाडीतील इमारतींच्या भिंतीवर चिमुकल्यांना समजण्यासाठी बोलकी चित्रंही काढली जाणार आहेत.
-जे. बी. गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण विभाग
Web Title: Todays Latest District Marathi News Spg22b00374 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..