म्हसोबावाडी वनक्षेत्रात दुर्गंधीयुक्त पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसोबावाडी वनक्षेत्रात दुर्गंधीयुक्त पाणी
म्हसोबावाडी वनक्षेत्रात दुर्गंधीयुक्त पाणी

म्हसोबावाडी वनक्षेत्रात दुर्गंधीयुक्त पाणी

sakal_logo
By

शेटफळगढे, ता.७ : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथील वन क्षेत्रात वारंवार दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात आहे. हे पाणी पिल्यामुळे वन्य प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी माजी उपसरपंच नारायण थोरवे यांनी केली आहे.

म्हसोबावाडी परिसरात जवळपास दोनशे एकर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात हरिण, ससे यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून या वनक्षेत्रात दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात आहे. याप्रकरणी वन विभागाने स्थळपाहणी केली, मात्र कोणावरही कारवाई केलेली नाही. मात्र याप्रश्नाकडे दुर्लक्ष न करता कारवाई केल्यास भविष्यातील हानी टाळता येईल, असे थोरवे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Spg22b00376 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top