
शेटफळगढेत ऊस लागवडी रखडल्या
शेटफळगढे, ता.२० : येथील परिसरातील शेतकऱ्यांनी उसाच्या लागणीसाठी सरी काढून सर्व तयारी पूर्ण केली आहे. मात्र पावसाने दडी दिल्याने ऊस लागवडी रखडल्या आहेत. प्रतिवर्षी सरासरी १५ मे नंतर मान्सूनपूर्व पाऊस पडतो.परंतु यावर्षी फक्त एकदाच पाऊस झाला आहे. आता मॉन्सूनपूर्व पावसाचा कालावधी संपून खऱ्या अर्थाने पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. मात्र, अद्याप पावसाचे जोरदार आगमन झाले नाही. गतवर्षी लवकर पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना सहाव्या महिन्यातील उसाच्या लागवडी करता आल्या होत्या. त्यामुळे या वर्षीही मागील वर्षासारखा चांगला पाऊस होईल. या आशेवर शेतकऱ्यांनी यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस उसाच्या लागणीसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने सरी काढून ठेवल्या आहेत. मात्र, अद्याप पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे चांगला पाऊस झाल्यानंतरच शेतकरी प्रत्यक्षात उसाची लागण करण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Spg22b00380 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..