शेततळे खोदण्याचे अनुदान एक लाख करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेततळे खोदण्याचे अनुदान
एक लाख करण्याची मागणी
शेततळे खोदण्याचे अनुदान एक लाख करण्याची मागणी

शेततळे खोदण्याचे अनुदान एक लाख करण्याची मागणी

sakal_logo
By

शेटफळगढे, ता. ६ : राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे खोदण्यासाठी कमाल एक लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
राज्य सरकारच्या कृषी विभागाने २९ जूनच्या शासन निर्णयाच्या आधारे शेतकऱ्यांना आकार मानानुसार किमान १५ हजार ७१७ रुपये ते कमाल ७५ हजार अनुदान देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. परंतु, डिझेलच्या दरवाढीमुळे पोकलेन व जेसीपी चालकांनी आपल्या प्रतितासाच्या दरात वाढ केली आहे. याशिवाय शेततळे खोदताना शेतकऱ्यांना कडक पाषाण लागल्यास ब्रेकरही लावावा लागत आहे. त्यामुळे सध्याच्या वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना हे ७५ हजार रुपयांचे अनुदान कमी पडत आहे. यापूर्वी सन २०१४ पर्यंत आकारमानानुसार शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी किमान ३५ हजार ते कमाल एक लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जात होते. सन २०१४ मध्ये युती सरकार आल्यानंतर शेतकरी लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी हे अनुदान कमी करून कमाल पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमधून अनुदान वाढवण्याची मागणी होत होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने २९ जून रोजी या अनुदानात वाढ करून कमाल ७५ हजार रुपये शेततळे खोदण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, तरी देखील वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना हे अनुदान अपुरे पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन अस्तित्वात आलेल्या सरकारने किमान शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Spg22b00393 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..