़‘कृषी विभागाच्या योजनांचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ द्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

़‘कृषी विभागाच्या योजनांचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ द्या’
़‘कृषी विभागाच्या योजनांचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ द्या’

़‘कृषी विभागाच्या योजनांचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ द्या’

sakal_logo
By

शेटफळगढे, ता. २२ : जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये राबविण्यात येत असलेल्या थेट लाभ हस्तांतर योजना अर्थात डीबीटी अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक योजनांसाठी अर्ज सादर करण्यास शेतकऱ्यांना २२ ऑगस्टपर्यंत जिल्हा परिषदेने मुदत दिली होती. परंतु, जनजागृती अभावी शेतकऱ्यांना या योजनेची माहिती झाली नाही. त्यामुळे या योजनेपासून कोणी वंचित राहू नये. यासाठी जिल्हा परिषदेने या योजनांसाठी अर्ज सादर करण्यास वाढीव मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
यापूर्वी या विभागांसाठी अर्ज करण्यास आजची अंतिम तारीख होती. मात्र या योजनांसाठी अर्ज सादर करताना शेतकऱ्यांना त्यासोबत सात बारा व आठ अ जोडणे अत्यावश्यक होते. मात्र वादळ व मागील आठवड्यातील पावसामुळे ऑनलाइन सातबारा काढण्यासाठी आवश्यक असणारा सर्वर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा व ८अ चे उतारे वेळेत मिळू शकले नाहीत. त्यामुळे या योजनेपासून जिल्ह्यातील शेकडो शेतकरी लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडील तीन पाच साडेसात अश्‍वशक्तीच्या विद्युत मोटारी, अडीच इंची व तीन इंची पीव्हीसी पाइप, कडबा कुट्टी, औषध फवारणी पंप या व विविध स्वरूपांच्या वस्तूंसाठी अर्ज सादर करण्याची आजची शेवटची मुदत आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज सादर करण्यास दहा सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देणे गरजेचे आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Spg22b00416 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..