शेटफळगढे येथील रस्ता दुरुस्तीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेटफळगढे येथील रस्ता दुरुस्तीची मागणी
शेटफळगढे येथील रस्ता दुरुस्तीची मागणी

शेटफळगढे येथील रस्ता दुरुस्तीची मागणी

sakal_logo
By

शेटफळगढे, ता. २५ : येथील शेटफळगढे ते भवानीनगर या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असताना या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
१९ किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या बाजू पट्ट्या खचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या रस्त्याचे दहा कोटी रुपयांच्या निधीतून दोन वर्षांपूर्वी काम झाले होते. परंतु सध्या पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला असून रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. यातून मार्ग काढताना विशेष करून दुचाकी स्वरांना त्रास होत आहे. त्यामुळे
दुचाकीस्वारांच्या सुरक्षित प्रवासासाठी या रस्त्याच्या बाजू पट्ट्या बांधकाम विभागाने भरणे बाबत संबंधित ठेकेदाराला सूचना द्याव्यात. अशी मागणी दुचाकी स्वार व नागरिकांतून होत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Spg22b00417 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..