Sat, Feb 4, 2023

शेटफळगढे येथे बाजरीच्या पिकाचे नुकसान
शेटफळगढे येथे बाजरीच्या पिकाचे नुकसान
Published on : 27 September 2022, 8:41 am
शेटफळगढे, ता. २७ : येथील परिसरात दिवसभर हलक्या स्वरूपाचा पाऊस येत होता. त्यामुळे या पावसाचा रब्बी पिकांच्या पेरणीसाठी उपयोग होणार असला तरी खरिपातील काढणीला आलेल्या व खुडलेल्या बाजरीचे मात्र या पावसामुळे नुकसान झाले आहे.
या पावसाने सध्या शेतात उभे असलेल्या ऊस व मका पिकांना फायदा झाला आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी या पावसाच्या जमिनीतील ओलीचा उपयोगही होणार आहे. मात्र शेतकऱ्यांची शेतात उभी असलेली बाजरीची खुडणी थांबली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी बाजरीचे कणसे खुडून ती मळणीसाठी वाळायला घातली होती. ती देखील काही प्रमाणात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.