
शेटफळगढे येथील वृक्षांना पाण्याचा तुटवडा
शेटफळगढे, ता. २७ : सामाजिक वनीकरण विभागाने इंदापूर तालुक्यात म्हसोबावाडी व निरगुडे गावच्या शिवारात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड केली आहे. परंतु या वृक्षांना संरक्षक जाळ्या नसल्याने व पाणी नसल्याने ही झाडे जळून जाण्याच्या मार्गावर आहे.
सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून शेटफळगढे परिसरातील म्हसोबाचीवाडी निरगुडे गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवडीसाठी खड्डे जून अखेरीस व जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात खड्डे खोदण्यात आले होते. त्यानंतर या खड्ड्यांमध्ये नुकतीच वृक्ष लागवड केली आहे. परंतु यातील अनेक वृक्ष हे या वृक्षांना संरक्षक जाळ्या बसविल्या नसल्यामुळे शेळ्या व इतर पशुधनांकडून खाल्ले जात आहेत. संबंधित विभागाकडे लागवडीपासून आगामी तीन वर्ष या वृक्षांना पाणी घालण्याची व जाळ्या बसवण्याची तरतूद आहे. परंतु ही वृक्ष लागवड होऊन जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी झाला असला तरी अद्याप या वृक्षांना संरक्षक जाळ्या बसविल्या नसल्याने सामाजिक वनीकरण विभागाने त्या तत्काळ बसवून ही झाडे या वृक्षांना पाणी घालून किमान तीन वर्ष जोपासणे गरजेचे आहे.