प्रचंड मेहनतीनेच यश प्राप्त ः दडस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रचंड मेहनतीनेच
यश प्राप्त ः दडस
प्रचंड मेहनतीनेच यश प्राप्त ः दडस

प्रचंड मेहनतीनेच यश प्राप्त ः दडस

sakal_logo
By

शेटफळगढे, ता. २८ : ‘अपयशाने खचून जाऊ नका, प्रचंड मेहनतीनेच यश मिळते,’ असे प्रतिपादन भिगवण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विनायक दडस यांनी केले.

शेटफळगढे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुकुल प्रकल्पाअंतर्गत संविधान दिनाचे औचित्य साधून व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी दडस यांनी विद्यार्थ्यांना करिअर कसे निवडावे, ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न कसे करावेत याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे प्राचार्य बी. आर. भिसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगितले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुकुल प्रमुख तात्यासाहेब गाडेकर यांनी, तर परिचय डॉ. काशिनाथ सोलनकर यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा वीरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व सेवकांनी परिश्रम घेतले.
----------------------------------