Mon, Jan 30, 2023

इंदापुरात ३ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी
Sowing wheat : इंदापुरात ३ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी
Published on : 9 December 2022, 11:53 am
शेटफळगढे : इंदापूर तालुक्यात ३ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. सध्या ऊस गाळपाला गेल्यानंतर उसाखालील क्षेत्र रिकामे होत आहे. त्यामुळे शेतकरी गव्हाच्या पिकाची पेरणी करण्यास प्राधान्य देत आहेत. तर काही शेतकरी कुटुंबाची वर्षभराची गव्हाची गरज भागेल, त्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र गव्हाच्या क्षेत्रासाठी पेरत आहेत. तर उर्वरित क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी शेतकरी करीत आहेत.
याशिवाय सध्या थंडी चांगली पडली असल्याने पेरणी केलेल्या गव्हाला याचा चांगला फायदा होत आहे. डिसेंबरअखेर शेतकरी गव्हाची पेरणी करीत असल्याने तालुक्यातील गव्हाच्या क्षेत्रात डिसेंबरअखेर आणखी वाढ होणार आहे, असे तालुका कृषी अधिकारी बी. एस. रूपनवर यांनी सांगितले.