निरगुडेच्या सरपंचपदी गौरी सोनवणे बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरगुडेच्या सरपंचपदी गौरी सोनवणे बिनविरोध
निरगुडेच्या सरपंचपदी गौरी सोनवणे बिनविरोध

निरगुडेच्या सरपंचपदी गौरी सोनवणे बिनविरोध

sakal_logo
By

शेटफळगढे, ता. १३ : निरगुडे (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या गौरी प्रदीप सोनवणे यांची बिनविरोध निवड झाी. यापूर्वीच्या सरपंच बायडाबाई खंडाळे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवीन सरपंच निवडीसाठी भिगवणचे मंडलाधिकारी डी. एस. कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अर्ज भरण्याच्या वेळेत केवळ गौरी सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने सोनवणे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे कोकरे यांनी जाहीर केले.
यावेळी उपसरपंच हनुमंत काजळे सदस्य देवेंद्र राऊत, सुषमा पवार, बायडाबाई खंडाळे, चतुराबाई लकडे, लताबाई रणधीर, माजी सरपंच ब्रह्मदेव केकान, यशवंत केकान, युवराज भोसले, विनायक रणधीर, राजेंद्र राऊत, महादेव सोनवणे, मारुती सोनवणे, राजेंद्र रसाळ, संतोष रणधीर, बापूराव सोनवणे, नागनाथ वाघमोडे, ग्रामसेवक गणेश जाधव, गाव कामगार तलाठी सतीश गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------
00791