
डॉ. वाळुंज, डॉ. चवरे यांना पुरस्कार प्रदान
शेटफळगढे, ता. २३ : ग्लोबल फाऊंडेशन इंडिया यांचे वतीने देण्यात येणारा बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड भिगवण येथील कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांना तर बेस्ट अकॅडेमिशियन अवॉर्ड प्रा. प्रशांत चवरे यांना देण्यात आला. शैक्षणिक वर्षे २०२२-२३ च्या पुरस्काराची घोषणा आणि वितरण नुकतेच फलटण (जि. सातारा) येथील मुधोजी महाविद्यालय येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये करण्यात आले.
या वेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर, ग्लोबल इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सप्तर्षी, श्रीलंकेतील कलानिया विद्यापीठातील डॉ. धर्मश्री लाल, गोव्याचे शिक्षण सहसंचालक डॉ. एफ. एम. नदाफ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भुगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. ज्योतीराम मोरे, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, प्रा. संतोष माने उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, संचालक पराग जाधव, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रणजित भोंगळे, संपत बंडगर, सुनील वाघ यांनी अभिनंदन केले.