म्हसोबावाडी रस्त्याची खडी उखडल्याने दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसोबावाडी रस्त्याची खडी उखडल्याने दुरवस्था
म्हसोबावाडी रस्त्याची खडी उखडल्याने दुरवस्था

म्हसोबावाडी रस्त्याची खडी उखडल्याने दुरवस्था

sakal_logo
By

शेटफळगदे, ता.६ : म्हसोबावाडी ते लाकडी या रस्त्याची खडी उखडल्याने दुरवस्था झाली आहे. यामुळे तत्काळ डांबरीकरणाचे करावे, अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे लाकडी गावच्या हद्दीपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
वन विभागात रस्त्याचे काम पूर्ण होणे बाकी आहे. मात्र, मसोबावाडी गावच्या हद्दीत जवळपास पाचशे मीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावरील खडी उखडून बाजूला निघाली आहे. त्यामुळे या खडीवरून दुचाकी चालवताना खडीवरून दुचाकी घसरून दुचाकीस्वार जखमी होत आहे. याशिवाय प्रवासालाही जास्त वेळ लागत आहे. यापूर्वी हा रस्ता चांगल्या पद्धतीचा डांबरी होता. मात्र नव्याने काम मंजूर झाल्यानंतर त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने तो रस्ता उकरून त्यावर पुन्हा खडीकरण केले आहे. यावेळी व्यवस्थित मुरमाचा मलमा न टाकल्याने सध्या खडी पूर्णपणे उचकटली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिगवण यांनी संबंधित ठेकेदाराला सदरचे उर्वरित राहिलेले डांबरीकरणाचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला पण तो होऊ शकला नाही.

00851