
पेठच्या वाकेश्वर विद्यालयात बाल, महिला सभा
सातगाव पठार ता. २७ : नागरिक आपल्या वीज, पाणी, रस्ते विविध योजनांबाबत तक्रारी व मागणी सतत ग्रामपंचायतीकडे करत असतात. मात्र शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या समस्या, अडचणी कधीच ग्रामपंचायतीमध्ये सांगत नाहीत. त्यामुळे त्यांच्या समस्या बालकांनी व महिलांनी ग्रामपंचायतीला दिल्या तर सुजाण नागरिक घडेल असे प्रतिपादन सरपंच संतोष धुमाळ यांनी केले.
पेठ (ता. आंबेगाव) येथील वाकेश्वर विद्यालयात पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत राज दिनानिमित्त बाल व महिला सभा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सरपंच संतोष धुमाळ बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य अशोक वळसे पाटील, प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम पोटे, ग्रामसेवक मोहम्मद चौघुले, पर्यवेक्षक शिवाजी आहेर, नारायण बनकर, बाळासाहेब धुमाळ, विजया ठाकूर, पूनम वणारसे उपस्थित होते.
पंचायत राज दिनानिमित्त वाकेश्वर विद्यालयात बाल व महिला सभेसाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. सदर सभेदरम्यान सरपंच संतोष धुमाळ यांनी पंचायत राज दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचा कारभार व नियोजन कसे असते याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच १४ व्या वित्तअयोगात बालक व महिलांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून महिला व बालकांवर अत्याचार होऊ नये. बालविवाह होऊ नयेत. ग्रामपंचायत मध्ये बालक व महिला यांना न्याय, रोजगार व हक्क मिळून त्यांना गावचा कारभार पाहणारे सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले नियोजन समजावून सांगितले. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुलींनी विविध प्रश्न विचारून सहभाग सभेमध्ये आपला सहभाग नोंदवला.
Web Title: Todays Latest District Marathi News Sth22b00950 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..