कोरगाव येथे शिबीरात ११० जणांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरगाव येथे शिबीरात ११० जणांची तपासणी
कोरगाव येथे शिबीरात ११० जणांची तपासणी

कोरगाव येथे शिबीरात ११० जणांची तपासणी

sakal_logo
By

सातगाव पठार, ता. २७ : कोरगाव (ता. आंबेगाव) येथे कारेगाव विविध कार्यकारी सोसायटी आणि अटलबिहारी वाजपेयी विचार मंच व डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यावेळी ११० रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घेतल्याची महिती आंबेगाव तालुका भाजपचे अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी दिली.
कोरेगावातील नागरिकांचा सदर शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. शिबिरात २० रुग्ण मोतीबिंदू असलेले सापडले. त्यांच्यावर अल्पदरात शस्त्रक्रिया करणार आरोग्यदूत सुशांत थारेात यांनी सांगितले. याप्रसंगी सरपंच कविता घेवडे, उपसरपंच पंढरीनाथ कराळे, महादेव कराळे, विलास घेवडे, सुमन कराळे उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यात डॉ. ताराचंद कराळे व अटल संस्थेचे संस्थापक संदीप बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प केला असल्याचेही थोरात म्हणाले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र कानडे यांनी केले व आभार आनंद कराळे यांनी मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Sth22b00951 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top