बटाटा परिषदेचे आज पेठे येथे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बटाटा परिषदेचे आज पेठे येथे आयोजन
बटाटा परिषदेचे आज पेठे येथे आयोजन

बटाटा परिषदेचे आज पेठे येथे आयोजन

sakal_logo
By

सातगाव पठार, ता. १५ : पेठ (ता.आंबेगाव) येथे सोमवारी (१६) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा व बटाटा परिषदेचे आयोजन केले आहे. मेळाव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिली.
बटाटा पिकाचे आगार समजल्या जाणाऱ्या सातगाव पठार आणि खेड तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये पावसाळी बटाट्याचे पीक घेतले जाते. येथील हवामान बटाटा पिकासाठी पोषक असते पावसाळी हंगामामध्ये एकमेव या भागांमध्ये बटाट्याचे पीक येते. मात्र, मागील तीन वर्षापासून येथील शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला असून सलग तीन वर्ष या शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांचे असलेले प्रश्न सोडविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे सदर मेळाव्यास शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Sth22b00960 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top